कौटुंबिक कलाहात वृद्ध पित्याच्या छातीत संतप्त मुलाने खुपसला सुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST2021-05-21T05:00:00+5:302021-05-21T05:00:07+5:30

नथ्थू आसूटकर हे पत्नी व मुलासह भेंडाळा येथे राहून शेती करीत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. ते नेहमी घरी दारू पिऊन वाद करीत असत. बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते घरी आले. या वेळी मुलगा वैभव याच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादात संतापलेल्या वैभवने धारदार सुरा भोसकून नथ्थु आसूटकर यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना वणीतील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

In the family art, an angry child hugged an elderly father | कौटुंबिक कलाहात वृद्ध पित्याच्या छातीत संतप्त मुलाने खुपसला सुरा

कौटुंबिक कलाहात वृद्ध पित्याच्या छातीत संतप्त मुलाने खुपसला सुरा

ठळक मुद्देझरी तालुक्यात निर्घृण खून : मारेकरी मुकुटबन पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
मुकुटबन : कौटुंबिक कलहातून संतापाच्या भरात मुलाने पित्याच्या छातीत सुरा भोसकून त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झरी तालुक्यातील भेंडाळा येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी मारेकरी मुलाला गुरुवारी सकाळी अटक केली. नथ्थु केशव आसूटकर (४८) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मारेकरी मुलगा वैभव नथ्थु आसूटकर याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मृत नथ्थु आसूटकर यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यापैकी एका मुलीचे लग्न झाले असून, दुसरी शिक्षणासाठी भद्रावती येथे राहत होती. नथ्थू आसूटकर हे पत्नी व मुलासह भेंडाळा येथे राहून शेती करीत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. ते नेहमी घरी दारू पिऊन वाद करीत असत. बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते घरी आले. या वेळी मुलगा वैभव याच्यासोबत त्यांचा वाद झाला. या वादात संतापलेल्या वैभवने धारदार सुरा भोसकून नथ्थु आसूटकर यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना वणीतील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, प्रकरण अंगलट येईल म्हणून नथ्थु आसूटकर यांचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा बहाणा करून थेट भेंडाळ्यात आणण्यात आला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची कुणकुण मुकुटबन पोलिसांना लागली. लगेच पोलिसांनी भेंडाळा येथे जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच वैभवलाही पोलीस ठाण्यात आणले. मृताचा भाऊ जगन केशव आसूटकर यांच्या तक्रारीवरून गुरुवारी सकाळी ७ वाजता वैभवला अधिकृत अटक करून त्याच्याविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी भेंडाळा येथे घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्माजी सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व जितेश पानघाटे करीत आहेत.

सलग दुसरी घटना 
 मुलाने वृद्ध पित्याचा खून केल्याची घटना बुधवारी पारवा ता. घाटंजी येथे घडली. या घटनेची वार्ता ताजी असतानाच बुधवारीच रात्री झरी तालुक्यातील भेंडाळा गावातही वृद्ध पित्याला पोटच्या मुलाने ठार केले. सलग घडलेल्या या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे. 
 

 

Web Title: In the family art, an angry child hugged an elderly father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.