रिफिलिंग करताना सहा गॅस सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST2021-12-13T05:00:00+5:302021-12-13T05:00:07+5:30

पोबारू लेआउटमध्ये जमील नामक व्यक्तीकडून गॅस रिफिलिंगचा व्यवसाय राजरोसपणे केला जातो. यापूर्वी पुरवठा विभागाने एकदा कारवाईचे धाडस दाखविले होेते. मात्र त्यानंतर कुणी फिरकले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती वापराचा गॅस वाहनात इंधन म्हणून भरला जातो. हा प्रकार सुरू असतानाच पोबारू लेआउटमधील एका घरामध्ये अचानक स्फोट झाला. त्यात वाहनाने पेट घेतला. नंतर सहा वेळा स्फोटाचे आवाज आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

Explosion of six gas cylinders while refilling | रिफिलिंग करताना सहा गॅस सिलिंडरचा स्फोट

रिफिलिंग करताना सहा गॅस सिलिंडरचा स्फोट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील नागपूर रोड व पांढरकवडा रोडवर गॅस रिफिलिंगचे अवैध अड्डे चालविले जातात. घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस काढून वाहनांमध्ये भरला जातो. असाच प्रकार सुरू असताना पोबारू लेआउटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात एका वाहनानेही पेट घेतला. पाठोपाठ सहा सिलिंडर यात फुटले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.
पोबारू लेआउटमध्ये जमील नामक व्यक्तीकडून गॅस रिफिलिंगचा व्यवसाय राजरोसपणे केला जातो. यापूर्वी पुरवठा विभागाने एकदा कारवाईचे धाडस दाखविले होेते. मात्र त्यानंतर कुणी फिरकले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती वापराचा गॅस वाहनात इंधन म्हणून भरला जातो. हा प्रकार सुरू असतानाच पोबारू लेआउटमधील एका घरामध्ये अचानक स्फोट झाला. त्यात वाहनाने पेट घेतला. नंतर सहा वेळा स्फोटाचे आवाज आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. ही आग धुमसत होती. खुल्या जागेत हा प्रकार घडल्याने इतरत्र ती आग पसरली नाही व यात कुणी जखमीही झाले नाही. मात्र आगीचे लोळ पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही तासानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. तेव्हा शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग आटोक्यात आली होती. 

नागरिकांमध्ये रोष
प्रशासकीय यंत्रणेचे अभय मिळत असल्याने या परिसरात गॅस रिफिलिंगचा व्यवसाय फोफावला आहे. यातून मोठी दुर्घटना होण्याचा धोका अटळ आहे. त्यानंतरही या अवैध व्यवसायाकडे बऱ्याचदा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. यातून परिसरात मोठी दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मानवी जीविताशी सुरू असलेला हा खेळ तत्काळ थांबविण्यात यावा, अशा भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

Web Title: Explosion of six gas cylinders while refilling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग