तरुणाई इंटरनेटच्या मायाजालात

By Admin | Updated: June 28, 2014 01:16 IST2014-06-28T01:16:09+5:302014-06-28T01:16:09+5:30

इंटरनेटमुळे जग जवळ आले. माहिती आणि तंत्रज्ञानाची वाट सुकर झाली. अद्यावत माहिती क्षणात उपलब्ध करून देणारे इंटरनेटचे जाळे आता तरुणाईलाच मायाजाळात अडकवित आहे.

The excitement of youth is in the hell of the internet | तरुणाई इंटरनेटच्या मायाजालात

तरुणाई इंटरनेटच्या मायाजालात

संतोष अरसोड यवतमाळ
इंटरनेटमुळे जग जवळ आले. माहिती आणि तंत्रज्ञानाची वाट सुकर झाली. अद्यावत माहिती क्षणात उपलब्ध करून देणारे इंटरनेटचे जाळे आता तरुणाईलाच मायाजाळात अडकवित आहे. अनेकांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेल्या अश्लील चित्रफितीही आढळून येतात. मात्र पालकांपासून सोईस्कररीत्या लपविल्या जाते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पालकांच्या हा प्रकार लक्षात येतो. परंतु डोक्यावर हात मारून घेण्यापलिकडे त्यांच्याकडे पर्याय नसतो. यासाठी पालकांनी वेळीच जागरुक होणे गरजेचे आहे.
सध्या तरूण पिढीसह अल्पवयीन मुलेही अश्लीलतेच्या जाळ्यात अडकली आहे. सायबर कॅफेवर जाऊन आपली मुले काय करतात, याकडे पालकांचे लक्ष नसते. कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि अ‍ॅन्ड्राईड फोनच्या नादी लागल्याने शिक्षण घेतांनाच अनेक जण अश्लीलतेच्या विळख्यात अडकतात. काही मोबाईल कंपन्यांच्या वेबसाईडवर अर्धनग्न देहांचे दर्शन होते आणि येथूनच सुरू होतो अश्लीलतेच्या घाणेरड्या अन् घातक वाटेवरील प्रवास. शहरातील एका समुपदेशन केंद्रात भेट दिली असता अनेक गंभीर विषय समोर आले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विभिन्न लिंगी आकर्षण असते. प्रत्येकाला बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफे्रन्ड असावी, असे वाटते. गर्लफ्रेन्ड नसलेल्यांना मित्र परिवारातील टोळके चिडवत असतात. यातूनच निर्माण झालेले आकर्षण मुलींसाठी भविष्यात घातक ठरते. प्रेमाचे अनेक प्रसंग बॉयफ्रेन्ड त्याच्या मोबाईलमध्ये कैद करतो. मात्र एकवेळ अशी येते की, त्यांचे संबंध अचानक तुटून जातात. अशा वेळी मुलगी मात्र आपल्या मोबाईलमधील प्रियकरासोबत असलेले सगळे प्रसंग डिलिट करते. मात्र मुलगा ते प्रसंग डिलिट करत नाही. यातूनच भविष्यात त्या मुलीला ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही घडतात. हे प्रकार एवढे किळसवाणे होतात की नंतर जुन्या बॉयफ्रेन्डच्या मित्रांकडूनसुद्धा युवतींचे शोषण व्हायला लागते. अशा वेळी कुणीच बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांकडे जात नाही. मात्र समुपदेशन केंद्रामध्ये येऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. यवतमाळातही अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत, हे विशेष!
आपला मुलगा अथवा मुलगी काय करते, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे असते. त्यातही मुलींमध्ये या बाबत जागृती असणे आवश्यक आहे. ज्याच्यासोबत आपण प्रेम करतो तो आपला गैरफायदा तर घेत नाही ना, याची तिने काळजी घेतली पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी प्रेमाच्या गप्पा होतात तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तर लागले नाही ना, याचीसुद्धा मुलींनी काळजी घेतली पाहिजे. सध्या मोबाईल अनेक तरुण-तरुणी आपला महत्त्वपूर्ण वेळ घालवत असतात. अशा वेळेला रात्रीच्या वेळी आपले पाल्य लॅपटॉप, कॉम्प्युटर अथवा मोबाईलवर काय करीत असतात, याबाबत पालकांनी दक्ष राहणे गरजेचे असते.

Web Title: The excitement of youth is in the hell of the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.