शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

यवतमाळ जिल्ह्यात ईव्हीएम मशीन ट्रकमधून पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:33 AM

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेल्या ईव्हीएम मशीनच्या पेट्या उमरखेड येथून हिंगोलीकडे नेताना ट्रकमधून एक मशीन ठेवलीली पेटी रोडवर पडली.

ठळक मुद्देहिंगोली लोकसभा शेंबाळपिंपरीनजीक घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेल्या ईव्हीएम मशीनच्या पेट्या उमरखेड येथून हिंगोलीकडे नेताना ट्रकमधून एक मशीन ठेवलीली पेटी रोडवर पडली. ही घटना शुक्रवारी सकाळी पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरीनजीक उघडकीस आली. यामुळे प्रशासनाची काहीकाळ तारांबळ उडाली होती.हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातही गुरुवारी मतदान झाले. शुक्रवारी उमरखेड येथून सर्व ईव्हीएम मशीनच्या पेट्या ट्रकने (क्र.एम.एच.२६/ए.डी.८३६९) हिंगोली येथे पोहोचविल्या जात होत्या. शेंबाळपिंपरीनजीक या ट्रकमधून अचानक ७० क्रमांकाची ईव्हीएम मशीनची पेटी खाली पडली. मात्र याबाबत चालकाला काहीही कळले नाही. या ट्रकमागे काही अंतरावर पोलीस व महसूल विभागाची वाहने होती. त्यांच्या नजरेस ही बाब आली. त्यांनी लगेच ट्रक घेऊन चालकाला परत बोलविले. त्यानंतर ७० क्रमांकाची पेटी ट्रकमध्ये ठेवण्यात आली.ईव्हीएम मशीन पेट्या वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये मागे कुणीही बसलेले नव्हते. विशेष म्हणजे, ताडपत्रीला दोरी व्यवस्थित बांधलेली नव्हती. त्यामुळे पेटी रोडवर आदळल्याचे स्पष्ट होते. पेटी डांबर रोडवर आदळल्याने ईव्हीएमचे कंट्रोल युनिट निकामी तर झाले नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. या घटनेने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.शेंबाळपिंपरीनजीक ईव्हीएम मशीन पेटी डांबर रोडवर पडली. ही घटना खरी आहे. मात्र त्यातील ईव्हीएम मशीन आरक्षित असल्याने ती रिकामी होती.- स्वप्निल कापडणीसउपविभागीय अधिकारी, उमरखेड

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019