शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उपाययोजना साहित्य खरेदीत अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

कोरोना उपाययोजनेसाठी खरेदी केलेल्या वस्तूंचे भाव अवास्तव दाखविण्यात आले आहे. यामध्ये थ्रीलेअर मास्क हा प्रतिनग २० रुपयाप्रमाणे खरेदी केला. त्याचे बाजारमूल्य केवळ चार रुपये आहे. याचप्रमाणे दोन लेअर मास्क प्रतिनग १९ रुपयाने खरेदी केला. बाजारभाव ३.५० रुपये प्रतिनग आहे.

ठळक मुद्देपुसद नगरपरिषद : ‘एमआयएम’ने घेतला आक्रमक पवित्रा, चौकशी समिती बसविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोना विषाणू संसर्ग थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. याच आणीबाणीचा फायदा घेत पुसद नगरपरिषदेमध्ये साहित्य खरेदीचा मोठा घोटाळा झाला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, यासाठी एमआयएमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.कोरोना उपाययोजनेसाठी खरेदी केलेल्या वस्तूंचे भाव अवास्तव दाखविण्यात आले आहे. यामध्ये थ्रीलेअर मास्क हा प्रतिनग २० रुपयाप्रमाणे खरेदी केला. त्याचे बाजारमूल्य केवळ चार रुपये आहे. याचप्रमाणे दोन लेअर मास्क प्रतिनग १९ रुपयाने खरेदी केला. बाजारभाव ३.५० रुपये प्रतिनग आहे. सर्जिकल मास्क , हॅन्डग्लोब्ज, अ‍ॅप्रॉन, कम्प्लीट पीपीई किट लायझोल आयपी ग्रॅन्ड, सॅनिटायझर, फेसशील्ड, इन्फ्रारेड थर्मामिटर, पल्स ऑक्सिमीटर बॅटरी असलेले हॅन्ड स्प्रे या साहित्याची खरेदी करताना बाजारभावापेक्षा तिप्पट, चौपट दर नगरपरिषदेने मोजले आहेत. याशिवाय मंडप टाकणे, बॅरेकेटस लावणे यावरही मोठी रक्कम खर्च केली आहे. मंडपासाठी आठ लाख ८३ हजार ३५० रुपये तर बॅरेकेटसवर चार लाख ४१ हजार ४८६ रुपये खर्च दाखविला आहे. प्रत्यक्षात इतका खर्च झाला नसल्याचे बाजार भावानुसार दिसून येते. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची गरज आहे. बॅरेकेटींग व मंडप व्यवस्था देणारा कंत्राटदार हा नगरपालिका कर्मचारी आहे व त्याचा मुलगा आहे. सर्व खरेदीची उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करून संवेदनशील काळात निधीच्या अपहार करणाऱ्यांवर योग्य कारवाई केली जावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळे तालुकाध्यक्ष अमजद खान, मिर्झा आदिल बेग, सैय्यद सिद्दिकोद्दीन, फिरोज खान, डॉ.अन्सार, सोशल मीडिया शेख अतीक, अब्दुल रहेमान चव्हाण आदी उपस्थित होते.दरामध्ये तफावतपालिकेने दहा हजार ९६१ कापडी मास्कची खरेदी केली. या प्रत्येक मास्कचा दर १४ रुपये दाखविला आहे. बाजारात या मास्कचा ठोक भाव प्रति मास्क तीन रुपये आहे. १ लाख ५० हजार ३८५ रुपये कापडी मास्क खरेदीवर खर्च केले. बाजार भावापेक्षा चौपट दराने साहित्य खरेदी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या