शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाच्या इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा

By admin | Updated: August 24, 2015 00:16 IST

राज्यात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यासाठी अंतरिम उपाययोजना म्हणून प्रायोगिक तत्वावर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

शासनाचा निर्णय : विजेमुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा प्रयत्नयवतमाळ : राज्यात वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यासाठी अंतरिम उपाययोजना म्हणून प्रायोगिक तत्वावर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यातून अपमृत्युंचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या राज्यातील एकूण २३ शासकीय इमारतींवर वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन लाख ५५ हजार रुपये या प्रमाणे २३ इमारतींसाठी ५८ लाख ६५ हजार रुपये खर्चास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. या संदर्भात ई-निविदा प्रक्रियेत सर्वात कमी दर असलेल्या पुणे येथील एका एजन्सीमार्फत हे वीज अटकाव यंत्रणा बसविण्याची व्यवस्था करण्याचेही शासनाने सुचविले आहे. याबाबत शासनाने काही निकष ठरविले आहे. त्यानुसार वीज अटकाव यंत्रणा बसविण्याबाबत महसूल व वन विभाग, मदत कार्य, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापनसंदर्भातील शासन निर्णयातील अटींचे तंतोतंत पालन करण्यात यावे, ज्या शासकीय इमारतींवर सदर यंत्रणा बसविण्यात येणार आहे, त्या इमारतींच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकात वीज अटकाव यंत्रणेसाठी तरतूद करण्यात आलेली नाही, तसेच यापूर्वी सदर इमारतीवर ही यंत्रणा बसविण्यात आली नाही, याची खातरजमा करावी आणि त्यानंतरच यंत्रणा बसविण्यात यावी, या संदर्भातील निकडता समाजकल्याणचे आयुक्त (पुणे) यांनी तपासून पहावी आदींसह इतरही काही अटी ठरवून दिल्या आहेत. या यंत्रणेमुळे वीज पडून होणाऱ्या मृ्त्युंच्या संख्येत निश्चितच घट येणार आहे. (प्रतिनिधी)