शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

वीज बिल माफ झालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:00 AM

लॉकडाऊन होवून १४० दिवस उलटून गेले आहे. या काळात उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय आदींची दमछाक झाली आहे. अशातच हजारो रुपयांची देयके त्यांच्या माथी मारण्यात आली आहे. दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची देयके माफ करावी, अशी मागणी करण्यात आली.

ठळक मुद्दे३०० युनीटपर्यंतचे बिल रद्द करा : २० ते २५ टक्के सवलत जाहीर करून ग्राहकांची क्रूर चेष्टा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापरत असलेल्या घरगुती ग्राहकांची मागील तीन महिन्यांची वीज देयके माफ करावी, या मागणीसाठी वीज ग्राहक संघटनेतर्फे सोमवारी निवेदन देण्यात आले.संघटनेतर्फे १३ जुलै रोजी वीज बिलांची होळी करून राज्य सरकारला निवेदन दिले जाते. दरम्यान, २० ते ३० टक्के सवलत सरकारने जाहीर केली. हा प्रकार जनतेची क्रूर चेष्टा करणारा असल्याचे सांगत सोमवारी पुन्हा निवेदन देण्यात आले.लॉकडाऊन होवून १४० दिवस उलटून गेले आहे. या काळात उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय आदींची दमछाक झाली आहे. अशातच हजारो रुपयांची देयके त्यांच्या माथी मारण्यात आली आहे. दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील तीन महिन्यांची देयके माफ करावी, अशी मागणी करण्यात आली.निवेदन देताना विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापुरकर, विदर्भ उपाध्यक्ष राजू जेकब, दत्ता कुळकर्णी, प्रा.डॉ. अमोल देशमुख, सुहास सावरकर, अविनाश धनेवार, आशीष कुसुम्बीवाल, राजू राजा, मनिष शर्मा, पराग जोशी, अमोल डहाके, विजय भुसेवार आदी उपस्थित होते.विदर्भ राज्य आंदोलन समितीने मुख्यमंत्र्यांना घातले साकडेयवतमाळ : कोरोना काळातील अवाजवी वीज बिलातून विदर्भातील नागरिकांना मुक्त करा, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. कोरोना लॉकडाऊनपासून उद्योग, व्यापार, रोजगार मंदावले आहे. अनेकांचे रोजगार गेले. जवळ खायला पैसा नाही. अशा परिस्थितीत त्यांना अवाढव्य बिल आले आहे. या आपत्ती काळात नागरिकांचे वीज बिल सरकारने भरावे. कोरोनानंतर २०० युनीटपर्यंत वीज बिल मुक्त व नंतरचे वीज दर निम्मे करावे, शेतीपंपाचे वीज बिल थांबवा आदी मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भोंगाडे, हेमंत मुदलीयार, मधुसुदन कोवे, अशोक कपिले, श्रीधर ढवस, विजय चाफले, प्रल्हादराव काळे, संजय मेश्राम, युवराज साळवे, विजय आष्टीकर, लताताई जयस्वाल, कविताताई राठोड, सोनाली मरगडे, राजू राजगुरे, संतोष कुकुलवार, राजू कट्यारमल, मनोज अवस्थी, टिन्नू शर्मा, विक्की शर्मा, अमित अग्रवाल, संतोष हर्षे, रितेश शर्मा, अविनाश लष्करी, गणेश तोदी आदींनी निवेदन दिले.

टॅग्स :electricityवीज