शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय दबावात बनली नगरपरिषद मतदार यादी

By admin | Updated: October 9, 2016 00:07 IST

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

हजारांवर आक्षेप : शहराबाहेरील नावांचाच भरणा अधिक यवतमाळ : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदार यादी राजकीय दबावात तयार केल्याचा आक्षेप अनेकांनी नोंदविला. यामध्ये शहराबाहेरच्या मतदारांचीच नावे नोंदविण्यात आली. विशेष म्हणजे आक्षेप घेण्यासाठी नगरपरिषदेने त्यांच्या सोईचे फॉर्मेट ठरवून दिले. यावर तक्रारकर्त्यांनी संताप व्यक्त करून असा कुठलाही नियम नाही म्हणत हजरांवर आक्षेप दाखल केले आहे.प्रारुप मतदार यादीवरील आक्षेप निकाली काढून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया नगरपरिषदेत सीओंच्या अधिकारातच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मतदार यादीत सत्ताधाऱ्यांकडून ढवळाढवळ करण्यात आल्याचा थेट आरोप होत आहे. शहरात २८ प्रभाग असून त्यातून ५६ उमेदवार निवडायचे आहेत. प्रारुप मतदार यादीनुसार दोन लाख ३३ हजार ६०५ मतदार आहेत. प्रभागनिहाय मतदार यादीचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात आले असून त्यावर २६ सप्टेंबरपासून आक्षेप मागविण्यात आले होते. सुरूवातीला आक्षेपासाठी कुठल्याही फॉर्मेटची सक्ती करण्यात आली नाही. मात्र जसजसा आक्षेपांचा ओघ वाढला, तशा मतदार यादीतील चुका प्रखरपणे मांडण्यात येऊ लागल्या. त्यानंतर मात्र सावरुन घेण्यासाठी ठराविक फॉर्मेटमध्येच आक्षेप घ्यावा, अशी सक्ती करण्यात आली. शेवटच्या दिवशी तर आक्षेप नोंदविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालिकेत गर्दी जमली होती. यात आजी-माजी नगरसेवकांचा समावेश होता. आक्षेप घेण्यासाठी कुठलेही ठराविक फॉर्मेट असावे, असा नियम नाही. त्यामुळे आम्ही देईल त्या पद्धतीचे आक्षेप स्वीकारावे लागतील, असा आग्रह करण्यात आला. त्यानंतर पालिका प्रशासनाला नमते घेऊन आलेले आक्षेप स्वीकारावे लागले. गुरुवारपर्यंत मतदार यादीच्या प्रारुपावर एक हजार आक्षेप प्राप्त झाले होते. शेवटच्या दिवशी आलेल्या आक्षेपांची वृत्तलिहीपर्यंत जुळवाजुळव झालीच नव्हती. त्यामुळे शेवटच्या दिवशी किती आक्षेप आले, हा आकडा मिळू शकला नाही. अंतिम मतदार यादी १५ आॅक्टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. तत्पूर्वी दरम्यानच्या काळात या आक्षेपांवर सुनावणी होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)सोईची नावे केली समाविष्ट मतदार नोंदणी कार्यक्रम राबविताना राजकीय दबावात मतदार यादीत सोईची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. प्रभागबाहेरच्या व्यक्तींचे नावही या यादींमध्ये आहे. इतकेच नव्हे तर शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांची नावे यादीत दिसून येतात. यावरच अनेकांनी आक्षेप घेतला आहे. निवडणुकीचे गणित जुळविण्यासाठी बाहेरचे मतदार नोंदविण्याचे काम इच्छुक उमेदवारांकडून केले जाते. आता या नावांना प्रारुप यादीतून वगळण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे. शिवाय प्रभागाबाहेर मतदान असलेल्या नागरिकांचेही नाव त्याच प्रभागातील मतदान केंद्राच्या यादीत समाविष्ट केले जाते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कुठलाही दबाव आलेला नाही. या प्रारुप याद्या असून त्यामध्ये दुरुस्ती करण्याची व्यवस्था आहे. आक्षेपाप्रमाणे पुन्हा सर्व्हे करून योग्य फेरबदल केले जाणार आहे. त्यानंतरच अंतिम यादी प्रसिद्ध होईल.- सुदाम धुपेमुख्याधिकारी, यवतमाळ