राळेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक
By Admin | Updated: April 1, 2015 02:02 IST2015-04-01T02:02:44+5:302015-04-01T02:02:44+5:30
राळेगावसह तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अधिसूचना तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली.

राळेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक
राळेगाव : राळेगावसह तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अधिसूचना तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली. यासोबतच नामनिर्देशनपत्र स्वीकारणे सुरू झाले असून ही प्रक्रिया ७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. तहसीलदार-नायब तहसीलदार संघटना आणि शासन यांच्यात झालेल्या यशस्वी तडजोडीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. सहा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदारांनी नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. नायब तहसीलदार दिवाकर जुगनाके हे राळेगाव, नागठाना, रामतीर्थ, गुजरी, वालदूर, आष्ठा ग्रामपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहे. नायब तहसीलदार आर.एम. मडावी हे धानोरा, वनोजा, येवती, सावंगी पेरका, सोनुर्ली, लोहारा, मंडळ अधिकारी ए.जी. गोगटे हे रावेरी, वरना, झाडगाव, तेजनी, निधा, सरई, मंडळ अधिकारी व्ही.एन. वाघ हे टाकळी, वरूड, पिंपळखुटी, आपटी-रामपूर, चिखली-वनोजा, अंतरगाव या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी आहे. मंडळ अधिकारी व्ही.जी. दुधपोळे हे वाऱ्हा, शेळी, झरगड, चहांद, पिंपरी दुर्ग या गावचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. मंडळ अधिकारी यू.जी. कर्णेवार हे निवडणूक अधिकारी असलेल्या खेमकुंड, एकुर्ली, श्रीरामपूर, चोंढी, खैरगाव कासार, मंगी या गावची पोटनिवडणूक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)