शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
3
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
4
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
5
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
6
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
7
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
8
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
9
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
10
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
11
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
12
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
13
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
14
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
15
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
16
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
17
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
18
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
19
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
20
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण

त्वचारोगाने गावेच्या गावे बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:31 PM

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बोंडअळीपासून वाचलेला कापूस घरात साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता आरोग्याची नवीच समस्या निर्माण झाली आहे. कापसातून संसर्ग होऊन शेतकºयांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील त्वचारोगाची लागण होत आहे.वणी तालुक्यासह मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातील अनेक गावे या आजाराने बेजार आहेत. कापसाला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर खाज सुटते. त्यानंतर ...

ठळक मुद्देकापसातील कीटकांची अ‍ॅलर्जी: वणीसह झरी, मारेगाव, पांढरकवडात रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बोंडअळीपासून वाचलेला कापूस घरात साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता आरोग्याची नवीच समस्या निर्माण झाली आहे. कापसातून संसर्ग होऊन शेतकºयांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील त्वचारोगाची लागण होत आहे.वणी तालुक्यासह मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातील अनेक गावे या आजाराने बेजार आहेत. कापसाला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर खाज सुटते. त्यानंतर शरीरावर लाल रंगाचे धामे येतात. त्यालाही खाज सुटते. त्यानंतर तेथे जखम तयार होते. औषधोपचारानंतरही किमान आठ दिवस हा आजार बरा होत नाही. अनेकांना तर औषधोपचार घेतल्यानंतरही पुन्हा-पुन्हा या आजाराची लागण होत आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारचा त्वचारोग पाहत असल्याचे अनेक जुन्याजाणत्या शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातील अनेक शेतांमध्ये अजुनही कापूस वेचणी सुरू आहे. कापूस वेचणाऱ्या मजुरांनादेखील या आजाराची लागण होत आहे. मजुरी बुडू नये म्हणून जुजबी औषधोपचार घेऊन हे मजूर शेतात कापूस वेचणी करीत आहेत.गावठी इलाजावर भरया आजाराने बाधित गावखेड्यातील रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात न जाता स्वत:वर गावठी ईलाज करीत आहेत. पेनकिलर मलम अथवा सर्दीसाठी वापरण्यात येणारा मलम त्वचारोगावर लावत आहेत. मात्र त्यामुळे हा आजार बरा होत नसल्याचा अनुभव रुग्ण घेत आहेत. आरोग्य विभाग मात्र या विषयात अद्यापही अनभिज्ञ आहे.कापसातील कीटकांपासून आजारबोंडअळीग्रस्त कापसात मोठ्या प्रमाणावर काळ्या रंगाचे किटक तयार झाले आहेत. या कीटकांमुळे हा त्वचारोग फैलावत असल्याचे शेतकरी सांगतात. अगदी कापसाच्या ढिगाऱ्याजवळून गेले तरी या आजाराची बाधा होत असल्याचा अनुभव अनेकांनी कथन केला. अनेक शेतकऱ्यांनी हा कापूस आपल्या घरात साठवून ठेवला आहे. मात्र या आजाराच्या भीतीपोटी या शेतकऱ्यांनी घरातील कापूस इतरत्र हलविला असल्याची माहिती घोन्सा येथील शेतकरी अनंता काकडे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.निंबाळ्यात पाहुण्यांना झाली बाधावणी-मारेगाव मार्गावरील निंबाळा येथील एका शेतकऱ्याने भांदेवाडा येथील जगन्नाथबाबा देवस्थानात जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी अनेक नातलग निंबाळा येथे सदर शेतकऱ्याच्या घरी अगोदरच्या दिवशीच मुक्कामाला आले. रात्री शेतकºयाच्या घरातच त्यांनी मुक्काम केला. याच घरात कापूस ठेऊन होता. रात्रीतून या सर्व पाहुण्यांच्या अंगाला खाज सुटल्याने हे पाहुणे चांगलेच बेजार झालेत. ही बाब लक्षात आल्यानंतर घरातील कापूस इतरत्र हलविण्यात आला.त्वचारोगाचे तुरळक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे वणी तालुक्यात या रुग्णांची संख्या कमी असावी असे वाटते. मात्र या आजारावर प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा तालुका ठिकाणावरील शासकीय रुग्णालयात औषधोपचार उपलब्ध आहेत.- डॉ.विकास कांबळे,तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी.