माकडांना हाकताना विजेच्या धक्क्याने शेतमजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:12 IST2018-06-11T22:12:49+5:302018-06-11T22:12:58+5:30
शेतात आलेले माकड हाकण्यासाठी झाडावर चढलेल्या शेतमजुराला जीवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नागापूर रुपाळा येथे सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

माकडांना हाकताना विजेच्या धक्क्याने शेतमजूर ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शेतात आलेले माकड हाकण्यासाठी झाडावर चढलेल्या शेतमजुराला जीवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नागापूर रुपाळा येथे सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
रामराव भीवाजी सावंत (५०) असे मृताचे नाव आहे. रामराव हा उमरखेड येथील शेतकरी शे.हारुनभाई यांच्या शेतात मजुरीचे काम करीत होता. सोमवारी दुपारी या शेतात माकडांचा कळप आला. त्यांना हाकलण्यासाठी रामराव एका झाडावर चढले. याच झाडाच्या फांदीजवळून गेलेल्या वीज तारेला स्पर्श झाला आणि जमिनीवर कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी आहे.