लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षणाचा उपयोग कुठे ना कुठे होतोच, पण व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्यावरही संबंधित व्यवसायात स्थानच मिळत नसेल, तर अशा अभ्यासक्रमाला कोण पसंती देणार? नेमकी हीच परिस्थिती डी.एड. अभ्यासक्रमाबाबत उद्भवली आहे. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती बंद होती. त्यामुळे जिल्ह्यातील डी.एड. काॅलेजेसना वाईट दिवस पाहावे लागत असून गेल्या सहा वर्षांत तब्बल अध्यापक विद्यालये बंद झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. जिल्ह्यात एकूण २७ अध्यापक विद्यालये असली तरी त्यातील मोजक्याच विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशित आहेत. या २७ विद्यालयांमध्ये डी.एड.च्या एकूण १७४० जागा उपलब्ध आहेत. मात्र, मागील सत्रात डी.एड.च्या पहिल्या वर्षाला केवळ ३६० तर द्वितीय वर्षाला २८३ विद्यार्थी होते. म्हणजेच, गेल्यावर्षी डी.एड.च्या १३८० जागा रिक्त राहिल्या. तर यंदा २०२०-२१ या सत्राकरिता केवळ १९१ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
पुन्हा दोन संस्थांचा प्रस्तावविद्यार्थ्यांविना अध्यापक विद्यालये चालविणे शिक्षणसंस्थांनाही जड जात आहे. त्यामुळे १४ महाविद्यालये बंद झाली. तर आता पुन्हा दोन विद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव संबंधित संस्थांनी प्रशासनाकडे दिला आहे. त्यातील एक विद्यालय यवतमाळ शहरातील असून दुसरे विद्यालय दारव्हा शहरातील आहे. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
विशेष फेरी अद्याप रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी विशेष फेरी राबविली जात आहे. त्यामुळे अनेकांना अर्ज दाखल करण्याची संधी आहे.
वर्मा समितीच्या निकषात न बसणारे १४ डी.एड. काॅलेज बंद झाले आहेत. २०१४ या सत्रापासून ही अध्यापक विद्यालये बंद झाली आहेत. - डाॅ. रमेश राऊत, प्राचार्य डायट, यवतमाळ
मी २०१२-१३ मध्ये डी.एड. केले. मात्र, तेव्हापासून शासनाने शिक्षक भरतीच केलेली नाही. टीईटीही दिली आहे. भरती सुरू झाल्याविना डी.एड. काॅलेजचे महत्त्व वाढणार नाही.- सुमित निकम, उमेदवार तरुण