शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

महागाईमुळे दिवाळीवर संक्रांत

By admin | Updated: October 20, 2014 23:20 IST

यंदाच्या दिवाळीवर महागाईमुळे संक्रांत ओढवली आहे. जवळपास सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्यांना दिवाळी साजरी करणे कठीण झाले आहे.

वणी : यंदाच्या दिवाळीवर महागाईमुळे संक्रांत ओढवली आहे. जवळपास सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्यांना दिवाळी साजरी करणे कठीण झाले आहे.दरवर्षी सर्वच आनंदाने आणि उत्साहाने दिवाळीची वाट बघतात. ‘दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा’, या म्हणीप्रमाणे आबालवृद्ध दिवाळं सणाची आतुरतेने वाट बघतात. दिवाळीत नवीन कापड खरेदी करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. दिवाळीनिमित्त घरात नवीन वस्तू घेण्याचीही ‘क्रेझ’ अलीकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळे या सणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी सर्वच दिवाळी येण्याची वर्षभर वाट पाहतात. मात्र यावर्षी महागाईने दिवाळीवरच संक्रांत आली आहे. दररोज वाढणारे भाव बघता दिवाळी सण कसा साजरा करावा, या विवंचनेत सामान्य जनता दिसत आहे. दिवाळीत बच्चे कंपनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करते. यानिमित्त मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची खरेदी होते. मात्र यावर्षी फटाक्यांच्या किमती जवळपास २५ ते ३० टक्के वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे फटाके खरेदीवर बंधने येण्याचीही शक्यता आहे. लहान मुले केवळ शोभेच्या फटाक्यांकडे आकर्षित होतात. आवाजाचे फटाके घेण्याचा कल आता कमी झाला आहे. मोठे मात्र आवाजाच्या फटाक्यांकडे अजूनही आकर्षित होतात. तथापि वाढलेल्या किमतीने फटाक्यांची खरेदी ‘खिसा’ बघूनच करावी लागणार आहे.फटाक्यांशिवाय दिवाळीत मोठ्या प्रमाणात कापडांची खरेदी केली जाते. मात्र कापडाच्या किमतीही सतत वाढत आहेत. परिणामी कापड खरेदीवरही बंधने येण्याची शक्यता आहे. आपली मिळकत बघूनच प्रत्येक जण कापड खरेदी करणार आहेत. विशेषत: लहान मुलांचा हिरमोड होऊ नये म्हणून पालकांना प्रथम त्यांच्या कापडांची तजवीज करावी लागणार आहे. त्यानंतर उरलेल्या पैशातून घरातील जाणती माणसे कापड खरेदी करणार आहेत.दिवाळी सणात घरात गोडधोड पदार्थ करण्याची चढाओढ गृहिणींमध्ये लागलेली असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सणासाठी किराणा जिन्नसांची खरेदी केली जाते. किराणा मालाच्या किमतीही सतत वाढतच असल्याने मात्र किराणा खरेदी करणेही कठीण होऊन बसले आहे. तरीही आवश्यक तेवढा किराणा खरेदी करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे निवडणूक आटोपताच शहरातील किराणा दुकानांमध्ये गर्दी होणार आहे. एकवेळ कापड खरेदी केले नाही तरी चालेल, पण किराणा खरेदी आवश्यक आहे. कापड, फटाके, किराणा सोबतच इतर पदार्थाची खरेदीही करावी लागणार आहे. मात्र या खरेदीला महागाईने लगाम लावला आहे. ऐपत पाहूनच सर्वांना खरेदी करावी लागणार आहे. या महागाईने आॅक्टोबरमधील दिवाळीवर जानेवारीतील संक्रांतीने आत्ताच संक्रांत आणल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लक्ष्मीपूजनाला सोने खरेदी करण्याकडेही अनेकांचा कल असतो. मात्र सोन्याचे भावही दरदिवसाला वाढत आहे. सध्या २७ हजारांच्यावर प्रती तोळा असलेले सोने पुन्हा वाढण्याचे संकेत सराफा व्यावसायीकाकडून मिळाले आहेत. त्यामुळे यावर्षी सोने खरेदीलाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तथापि सुखवस्तू कुटुंबे नक्कीच सोने खरेदी करतील़ मात्र सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)