शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या भीतीने महिला माहेरी

By admin | Updated: May 19, 2014 23:54 IST

रोजगाराच्या शोधात मजुरांचे स्थलांतरण ही जिल्ह्यात नित्याचीच बाब झाली आहे. मात्र दारव्हा तालुक्यातील जवळगाव येथील लहान मुलांना स्थलांतरित करण्याची वेळ गावकर्‍यांवर आली आहे.

संतोष तांगडे - बोरीअरब

रोजगाराच्या शोधात मजुरांचे स्थलांतरण ही जिल्ह्यात नित्याचीच बाब झाली आहे. मात्र दारव्हा तालुक्यातील जवळगाव येथील लहान मुलांना स्थलांतरित करण्याची वेळ गावकर्‍यांवर आली आहे. महिनाभरापासून गावात सुरू असलेल्या डेंग्यू सदृश आजाराने लहान मुलांसह महिलांना माहेरी पाठविले आहे. गावात एकाही घरी लहान मुले दिसत नाही, एवढी दहशत गावकर्‍यांनी घेतली आहे. दारव्हा तालुक्यातील जवळगाव येथे महिनाभरापासून डेंग्यू सदृश आजाराची साथ सुरू आहे. जवळपास १०० मुलांंना या आजाराची लागण झाली. २५ च्यावर बालकांचे रक्त नमुने डेंग्यू सदृश असल्याचे उपचारात पुढे आले. काही रुग्णांवर नागपूर येथेही उपचार करावे लागले. सध्याही नागपूर येथे राधा सुधीर गुघाणे या बालिकेवर उपचार सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून असलेल्या या आजाराची गावकर्‍यात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने उपाययोजना केल्या तरी साथ थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे आता येथील गावकर्‍यांनी लहान मुलांना स्थलांतरित करण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्येक घरातील लहान मुले आपल्या आईसह मामाच्या गावी गेले आहे. कुणी गावात येतोही म्हटले तरी तेथेच आणखी काही दिवस थांबा असा सल्ला जवळगावचे नागरिक देत आहे. जवळगाव हे १७०० लोकसंख्येचे गाव असून ३५० कुटुंब आहे. जवळपास ५० ते ६० कुटुंबातील लहान मुलांना त्यांच्या मातांसह स्थलांतरित करण्यात आले आहे. कोणत्याही घरात लहान मुल दिसत नाही. वयस्क महिला आणि पुरुष मंडळी तेवढी गावात दिसत आहे. यामुळे गावातील चहलपहल कमी झाली असून कुण्याही घरातून बालकाच्या रडण्याचा आवाज येत नाही. आजी-आजोबांसोबत खेळणारे नातवंड डेंग्यूच्या भीतीने बाहेरगावी गेल्याने आजी-आजोबा बेचैन झाले आहे. मात्र डेंग्यूच्या दहशतीने त्यांना घरी आणायचे कसे असा प्रश्न पडला आहे. डेंग्यू सदृश आजारानंतर आरोग्य यंत्रणेने या गावात तळ ठोकला. विविध उपाययोजनाही केल्या. मात्र गावकर्‍यांच्या मनातील भीती काढण्यात त्यांंनाही यश आले नाही. परिणामी गावातील गोकूळ स्थलांतरित झाले.