शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दुष्काळग्रस्त गावाचं शिवार पाणीदार झालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 9:30 PM

सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका वर्षात गावाचे संपूर्ण चित्रच पालटले.

ठळक मुद्देसंडे अँकर । कामासाठी युवकांचे स्थलांतर थांबले, शेतशिवारही समृद्धीच्या दिशेने, तोरनाळा गावात घडली किमया

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ:सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका वर्षात गावाचे संपूर्ण चित्रच पालटले. याला केवळ गावकऱ्यांचे श्रमदान आणि सकारात्मक दृष्टिकोन कारणीभूत ठरला. त्यातूनच हे दुष्काळग्रस्त गाव आज पाणीदार झाले आहे.या गावाने गतवर्षी पावसाळ्यापूर्वी श्रमदानातून आठ हजार ६६६ घनमीटरचे काम केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी १६६ शोषखड्डे केले. यंत्राच्या मदतीने एक लाख १४ हजार ६४६ घनमीटरचे काम करण्यात आले. यामुळे पावसाळ्यात १२ कोटी ६१ लाख लिटर पाण्याचा साठा झाला. या जलसमृद्धीने गावात आज आटलेल्या विहिरींनाही पाणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.शिवारात इतके खेळते पाणी आजपर्यंत पाहिले नव्हते, असे मत गावकरी व्यक्त करतात. भूजल स्त्रोतातही सुधारणा झाली. विहिरींना मोठ्या प्रमाणात झरे खेळते झाले. यातून ओलित वाढले. यावर्षी गावातले स्थलांतर कमी होण्यास मोलाची मदत लाभली. गावातच अनेकांना रोजगार मिळाला.दगडांचं गाव टँकरमुक्तडोंगरमाथ्यावर वसलेले तोरणाळा गाव दगडांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामुळे या गावाला नागालँड अशी ओळख मिळाली होती. दगडामुळे गावात पाणी नाही. यातून गावात सहा महिने टँकर लागलेलेच असायचे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी तीन किलोमीटर प्रवास करावा लागत होता. दुष्काळी स्थितीत या गावातील २५ जनावरे पाण्यावाचून मेली. मात्र वॉटरकप स्पर्धेने आज या गावाच्या शेतशिवारात मुबलक पाणी आहे.लहान, थोरांच्या पुढाकाराने शिवार हिरवेगारगावशिवारातील पाण्याचा प्रत्येक स्रोत गतवर्षीपर्यंत कोरडा पडत होता. मात्र लहान-थोरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे प्रत्येक स्रोताला पाणी आले. विविध प्रकारचे शेती उत्पादन या पाण्यावर घेतले जाऊ लागले. संपूर्ण शिवार हिरवेगार झाले. भाजीपाला, फळे याशिवाय दुबार पिकेही या भागात घ्यायला सुरुवात झाली.पाणीदार गावासाठी गावकरी आपल्या परीने युद्धपातळीवर काम करीत आहे. जलयुक्तशिवारमधून शासनाने काम दिल्यास हे गाव आदर्श ठरेल.- शेषराव राठोडमाजी सरपंच, तोरनाळागावकºयांच्या योगदानाने गावात हिरवे स्वप्न साकार करता आले. गावकºयांनी श्रमदानात भरपूर योगदान केल्यामुळे पाण्याचा आज सुकाळ झाला.- बेबी राठोडसरपंच, तोरनाळा