कृषी सहायकांचे धरणे, आजपासून उपोषण
By Admin | Updated: June 21, 2017 00:29 IST2017-06-21T00:29:27+5:302017-06-21T00:29:27+5:30
मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करावा,

कृषी सहायकांचे धरणे, आजपासून उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करावा, या प्रमुख मागणीसाठी कृषी सहाय्यकांनी सोमवारी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर धरणे दिले.
आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वात कृषी सहाय्यकांनी धरणे दिले. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तातडीने करावा. तो तयार करताना संघटनेला विचारात घ्यावे. कृषी सहाय्यकांमधून कृषी पर्यवेक्षकांची १०० टक्के पदे भरावी. सुधारित आकृतीबंधात कृषी सहाय्यकांचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.
त्यांनी आंदोलनाचे सात टप्पे तयार केले. त्यात आंदोलनाचा हा तिसरा टप्पा होता. मागण्या पूर्ण न झाल्यास २१ जुनपासून जिल्हा कचेरीसमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर १० जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या आंदोलनाला कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष हरिश रामटेके यांनी पाठींबा दिला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. के. चव्हाण, कार्याध्यक्ष डीे. के भवरे, कोषाध्यक्ष व्ही. के. कांबडी, सचिव एन. ए. ठाकरे आदींच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले.