शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

समाज माध्यमावर करू नका चुका, नाही तर कारागृहात जाण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

व्हाॅटस्ॲप, इंस्टाग्राम या माध्यमांवरही आलेल्या प्रत्येक फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारू नयेत. कुठलीही लिंक किंवा मेसेज शेअर करताना त्याचा सारासार विचार करावा. बऱ्याचदा आपल्या ध्यानीमनी नसतानाही वाहवत जाऊन चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होतो. नंतर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते. व्हाॅटस्ॲप ग्रुपमध्ये चर्चेतूनच वाद पेटतात. हा प्रकारही सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  आपल्याकडे सध्या फेसबुक अकाऊंट फेक बनवून पैशाची मागणी करणे, फोटोंचा वापर करून फेक अकाऊंटवरून ट्रोल करणे अशा स्वरूपाचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामुळे फेसबुक अकाऊंट सुरक्षित करण्यासाठीची प्रक्रिया प्रत्येक वापरकर्त्याने समजून घेणे गरजेचे आहे. व्हाॅटस्ॲप, इंस्टाग्राम या माध्यमांवरही आलेल्या प्रत्येक फ्रेंड रिकवेस्ट स्वीकारू नयेत. कुठलीही लिंक किंवा मेसेज शेअर करताना त्याचा सारासार विचार करावा. बऱ्याचदा आपल्या ध्यानीमनी नसतानाही वाहवत जाऊन चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी होतो. नंतर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते. व्हाॅटस्ॲप ग्रुपमध्ये चर्चेतूनच वाद पेटतात. हा प्रकारही सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहे. 

सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून- बऱ्याचदा भावनेच्या भरात चुकीच्या पोस्ट शेअर केल्या जातात. याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकते. - समाज माध्यमं हाताळताना कुठलाही आकस ठेवू नये. पोस्टचे परिणाम पाहूनच पुढे पाठवावे.

सोशल मीडियावर बदनामी; १३ जणांवर गुन्हेसायबर सेलकडे या वर्षात सोशल मीडियाच्या अनुषंगाने तब्बल १३ गुन्हे आले आहेत. यात मुलीच्या फोटोंचा वापर करून तिची बदनामी करण्याचाही गुन्हा आहे. या आरोपीला सायबर सेलने शोधून अटक केली. याशिवाय चुकीचे मेसेज शेअर करणारे, फोटोचे माॅर्फिंग करणारेसुद्धा सायबरच्या गुन्ह्यात अडकले आहेत.

अशी घ्या काळजी

फेक अकाऊंट बनविले असेल तर अशा अकाऊंटचा शोध घेऊन त्याचा यूआरएल मागून घ्यावा.

ओळखीच्या व्यक्तीलाच फ्रेंड रिकवेस्ट सेंड करा आणि परिचित व्यक्तीचच रिकवेस्ट एक्सेप्ट करा.

कुठल्याही आमिषाला बळू पडू नका. यातून फसगत होण्याची दाट शक्यता असते.

मुलींनो डीपी सांभाळा- समाजमाध्यमांच्या प्रोफाईलवर ठेवलेले फोटो घेऊन त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. - फेसबुक प्रोफाईलचा फोटो इतरांच्या हाती लागू नये यासाठी प्रोफाईल लाॅक करावे.- टू फॅक्ट ऑथेंटिकेशनचा वापर करून आपले अकाऊंट सुरक्षित करता येते.

सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम या युगात उपलब्ध झाले आहे. त्याचा सकारात्मक गोष्टींसाठी वापर केल्यास बरेच चांगले परिणाम दिसतात. मात्र, चुकीचा वापर केल्यास कारवाई अटळ आहे. - अमोल पुरी, सायबर सेलप्रमुख.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाcyber crimeसायबर क्राइम