शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

डाॅक्टरची हत्या : हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:00 IST

डॉ. हनुमंत धर्मकारे हे उपजिल्हा रुग्णालयातून चहा पटरीवर आले. तेथून चहापान घेवून बाहेर पडले असता पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. नंतर हा हल्लेखोर दुचाकीने पसार झाला. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक, गुन्हे अन्वेषण विभाग, सायबरसेल, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, न्याय वैज्ञानिक शाळा पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथक यांना पाचारण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील बालरोगतज्ज्ञाची मंगळवारी सायंकाळी भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनेनंतर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून हल्लेखोर हा ढाणकी मार्गाने मराठवाड्यात पळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याने उमरखेड ते ढाणकी हा प्रवास अवघ्या १२ मिनिटात केला. ४.४५ वाजता गोळीबार करून तो ढाणकीतील बारमध्ये ५.११ मिनिटांनी आढळून आला. हाच धागा पकडून त्याच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली आहे. तर तत्काळ आरोपीला अटक करा या मागणीसाठी डॉक्टरच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. डॉ. हनुमंत धर्मकारे हे उपजिल्हा रुग्णालयातून चहा पटरीवर आले. तेथून चहापान घेवून बाहेर पडले असता पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. नंतर हा हल्लेखोर दुचाकीने पसार झाला. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक, गुन्हे अन्वेषण विभाग, सायबरसेल, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, न्याय वैज्ञानिक शाळा पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथक यांना पाचारण केले. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे दोन्ही अधिकारी रात्रभर तळठोकून होते. डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा मृतदेह वैद्यकीय चिकित्सेससाठी नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे डॉक्टरचे नातेवाईक व समाजबांधवांनी आरोपीला अटक हेाईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. नांदेड शहरात रास्त रोको करण्याचा प्रयत्न केला. हत्येची सुपारी दिल्याचा संशयमारेकऱ्याची चेहऱ्याने ओळख पटली आहे. त्याच्या एकूण हालचालीवरून तो सराईत गुन्हेगार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही हत्या सुपारी देवून तर करण्यात आली नाही ना याही दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. 

हत्येचा २४ तासात छडा लावू : पोलीस अधीक्षक- डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या हत्येचे पडसाद बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही उमटले. सदस्यांनी डॉ. धर्मकारे यांच्य हत्ये संदर्भात चौकशी आणि तपासाबाबत मुद्दे उपस्थित केल्यानंतर पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले. २४ तासांत या हत्येचा छडा लावू, असे त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

रुग्णालये बंद ठेवून उमरखेडमध्ये घटनेचा निषेध - डॉक्टरच्या हत्येचा निषेध म्हणून उमरखेड शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहे. केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशननेसुद्धा या बंदला पाठिंबा दिला आहे. आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पावडी यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली. मयत डॉक्टरच्या भावाला हृदयविकाराचा झटका - डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या हत्येनंतर हादरलेला लहान भाऊ डॉ. बालाजी धर्मकारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस