आदिवासींच्या आरक्षणावर गदा आणू नका
By Admin | Updated: January 7, 2015 23:00 IST2015-01-07T23:00:59+5:302015-01-07T23:00:59+5:30
शासनाने संविधानाला आव्हान देत पाचव्या व सहाव्या सूचीतील तरतूदीस नजरअंदाज करून धनगड जातीला धनगर असे संबोधून आदिवासींचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आदिवासींच्या

आदिवासींच्या आरक्षणावर गदा आणू नका
यवतमाळ : शासनाने संविधानाला आव्हान देत पाचव्या व सहाव्या सूचीतील तरतूदीस नजरअंदाज करून धनगड जातीला धनगर असे संबोधून आदिवासींचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर गदा आणण्याचा घाट घालण्यात आला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास बिरसा ब्रिगेड तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल अशा अशयाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
आदिवासींच्या आरक्षणावर गदा आणून धनगर समाजाला आरक्षण देणे ही बाब संयुक्तीक नाही धनगर समाजाला आरक्षण देऊ नये ही कुणाचीच भूमिका नाही.
मात्र संविधानाने आदिवासींना दिलेल्या आरक्षणात त्यांना वाटा देऊन हक्कावर गदा आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आदिवासी समाजात शासनाप्रती आणि धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याच्या कृतीबाबत तीव्र रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी बिरसा ब्रिगेडच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
जिल्हा सचिव अजय घोडाम यांच्या नेतृत्वा असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास बिरसा ब्रिगेड तीव्र स्वरूपाचे
आंदोलन छेडेल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)