शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी CBI ची कारवाई!
2
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
3
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
4
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
5
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
6
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
7
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
8
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
9
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
10
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
11
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
12
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
13
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
14
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
15
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
16
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
17
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
18
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
19
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
20
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र

उमरीपठारच्या निराधार मायबापांची संवेदनशील गोतावळ्यात दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 21:38 IST

ज्यांना कुटुंबच नाही, त्यांचे कुटुंब बनले उमरी पठारचे वृद्धाश्रम. या निराधार मायबापांचा मुलगा होऊन शेषराव डोंगरे २७ वर्षांपासून निरंतर सेवा करीत आहेत. ज्येष्ठांच्या सेवाशुश्रृषेसाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या निधीतून सुसज्ज सेवाधाम बांधण्यात आले.

ठळक मुद्देवृद्ध सद्गदीत : माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते सेवाधामचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : ज्यांना कुटुंबच नाही, त्यांचे कुटुंब बनले उमरी पठारचे वृद्धाश्रम. या निराधार मायबापांचा मुलगा होऊन शेषराव डोंगरे २७ वर्षांपासून निरंतर सेवा करीत आहेत. ज्येष्ठांच्या सेवाशुश्रृषेसाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या निधीतून सुसज्ज सेवाधाम बांधण्यात आले. त्याच्या लोकार्पणाचे निमित्त साधून गुरुवारी माजी खासदार, माजी मंत्री, विद्यमान आमदार यांच्यासह शेकडो नागरिकांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत दिवाळी साजरी केली.तालुक्यातील उमरी पठार या आडवळणाच्या गावात संत श्री दोला महाराज वृद्धाश्रमाने सेवेची २७ वर्षे पूर्ण केली आहेत. लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांच्या खासदार निधीतील १० लाखातून येथे सेवाधाम बांधण्यात आले. या इमारतीचे लोकार्पण गुरुवारी विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या सेवेसाठी आलेली शेकडो मुले पाहून येथील ८७ वृद्धांचे चेहरे आनंदाने खुलून गेले होते. विशेष म्हणजे, विजय दर्डा यांनी थेट या वृद्धांच्या गर्दीत बसून हितगुज केले. त्यांची सुख-दु:खे जाणून घेतली. आर्थिक दिलासा देतानाच त्यांना मानसिक आधारही दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द. तु. नंदापुरे गुरुजी होते. तर प्रमुख अतिथी स्वामी योगचित्तम सरस्वती, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, संस्थेचे अध्यक्ष सुरेश राठी, कांतीलाल कोठारी, प्रेमासाई महाराज, संस्थापक सचिव शेषराव डोंगरे आदी उपस्थित होते.विजय दर्डा म्हणाले, मी आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. आनंद गावंडेंनी माझी डोंगरेंशी भेट घडवून आणली. त्यातून या चांगल्या कामासाठी मला हातभार लावता आला. इथे येऊन मी स्वत:ला धन्य मानतो. कारण माझे आईवडिलांवर नितांत प्रेम आहे. मोठ्यांची सेवा हाच मी धर्म मानतो. देऊळ बांधण्यापेक्षा वृद्धाश्रम महत्त्वाचे आहेत. समाजात देणाऱ्यांची कमी नाही, फक्त विश्वासाची कमी आहे. शेषराव डोंगरेंनी २७ वर्षांपूर्वी वृद्धाश्रमाचे काम सुरू केले. आईवडिल समजून ते वृद्धांची सेवा करीत आहेत. यापेक्षा दुसरे पुण्याचे काम नाही.तरुणांना आवाहन, आमदारांना सूचना अन् ज्येष्ठांचे आशीर्वादकार्यक्रमाचे उद्घाटक विजय दर्डा म्हणाले, समाजात वृद्धांविषयीचा आदर कमी होत चालला आहे. तरुणांना म्हातारी माणसे ओझे वाटू लागली आहेत. त्यामुळे सध्या विकास आणि विनाश एकाच वेळी होत आहे. मात्र तुम्ही जे कराल, तेच भराल. म्हणून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होणे महत्त्वाचे आहे. या परिसरातील सर्व तरुणांनी नेहमी उमरी पठारच्या वृद्धाश्रमात यावे. येथील वृद्धांसोबत बोलावे. त्यांना मानसिक आधार द्यावा. तर या भागातील आमदारांनी वृद्धांसाठी विविध योजनांतून मिळणारे अनुदान या वृद्धाश्रमाला मिळते की नाही, हे पाहावे. मिळत नसेल तर सरकारला त्याबाबत सांगावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्व ज्येष्ठांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा की चांगले विचार घेऊनच आम्ही समाजात काम करावे.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाYavatmalयवतमाळ