समाजप्रेमींच्या दातृत्वावरच दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:00 AM2020-11-20T05:00:00+5:302020-11-20T05:00:06+5:30

यवतमाळातील धनगरसमाज, धनगर महिला संघर्ष समिती, ईनरव्हील क्लब, बाभूळगाव विकास मंच, स्वामिनी या संघटनांनी यावर्षीच्या दिवाळीत गोरगरीबांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी मोलाचा हात दिला.  मात्र अनेक कुटुंबापर्यंत संघटनांची मदत पोहोचू शकली नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या तुलनेत समाजसेवी संघटनांची मदत अपुरी पडली. मात्र त्यांनी केलेला प्रयत्न माणुसकी जोपासणारा ठरला आहे.

Diwali is on the charity of socialists | समाजप्रेमींच्या दातृत्वावरच दिवाळी

समाजप्रेमींच्या दातृत्वावरच दिवाळी

googlenewsNext
ठळक मुद्देपालांमध्येही आनंदाचे दिवे; फाटक्या कापडांवरच बच्चेकंपनींचा निरागस उत्साह

  रूपेश उत्तरवार
    लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यंदा दिवाळीत काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत दु:खीतांच्या कुटुंबात आनंद पसरविण्याचा प्रयत्न केला. वंचितांना कपडे, फराळाचे साहित्य, फटाके आणि इतर काही वस्तू दान केल्या. 
यवतमाळातील धनगरसमाज, धनगर महिला संघर्ष समिती, ईनरव्हील क्लब, बाभूळगाव विकास मंच, स्वामिनी या संघटनांनी यावर्षीच्या दिवाळीत गोरगरीबांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी मोलाचा हात दिला.  मात्र अनेक कुटुंबापर्यंत संघटनांची मदत पोहोचू शकली नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या तुलनेत समाजसेवी संघटनांची मदत अपुरी पडली. मात्र त्यांनी केलेला प्रयत्न माणुसकी जोपासणारा ठरला आहे. यातून अनेक कुटुंबांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरल्याचे चित्र पहायला मिळाले. इतरांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच खरी दिवाळी असे म्हणत या संघटनांनी आपला सामाजिक उपक्रम जपला आहे. 
आता अनेक संघटनांनी या चांगल्या कार्यासाठी पुढे येण्याची नितांत गरज आहे. तरच समाजातील दुर्लक्षित घटक दिवाळीचा सण उत्साहाने साजरा करू शकणार आहे. अशा प्रकाराचा उपक्रम जिल्हाभरात आणि गावखेड्यांमध्ये झाला तर प्रकाश पर्वाचा खरा उद्देश सफल होण्यास मोलाची मदत मिळणार आहे. 

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली
आम्ही सर्वजण रोजमजुरी करुन पोट भरतो. घरातील महिला मंडळी धुणे-भांडी करतात. यातून कुटुंबाचा गाडा चालतो. कोरोना काळात हातचा रोजगार गेला. यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णत: बिघडली. अशात दिवाळीचा सण तोंडावर आला. आमच्या कुटुंबाला ही मदत मिळाली नाही, मात्र ज्यांना मिळाली ते भाग्यवान आहे. सर्वांसाठी असे माणसे पुढे यावेत. 
झोपडीतील मुलांना हवा आकाश दिवा 
आपल्याही घरावर दिवाळीचा चमचमणारा दिवा प्रकाशित व्हावा, घरांमध्ये प्रत्येकांना नवे कपडे मिळावे, दररोज गोडधोड जेवायला मिळावे आणि आनंदाचे वातावरण सतत कायम रहावे असे कुटुंबातील प्रत्येकांना वाटते. ही मदत एका चमत्काराप्रमाणे कुटुंबाला मिळाली. याचा सर्वाधिक आनंद होता. 

इतरांचे फटाके पाहूण लुटला आनंद
काही कुटुंबांना मदत मिळाली तर अनेकांना ही मदत मिळाली नाही. इतरांनी फोडलेले फटाके पाहून या कुटुंबीयांनी आपला आनंद साजरा केला. आंब्याचे तोरण आणि झेंडूची फुले वाहून पूजा केली. 

मिळालेली मदतच ठरली जणू खरेदी  
हातात पैसाच नसल्याने दिवाळीला काही खरेदी करताच आले नाही. कुणाकडून मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र काहींना मदत मिळाली तर अनेकांना ही मदत मिळाली नाही. आहे त्यातच समाधान मानून दिवाळीचा सण साजरा झाला. मोफत धान्य सर्वांना आधार देणारे ठरले. 

Web Title: Diwali is on the charity of socialists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी