पुसद येथे राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचा जिल्हास्तरीय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:54 IST2017-10-13T22:54:44+5:302017-10-13T22:54:57+5:30

आॅल इंडिया एकता फोरम व राष्टÑीय मायनॉरिटी पुरस्कृत राष्टÑीय मुस्लीम मोर्चाच्यावतीने येथील छत्रपती चौकात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

District-level meeting of the National Muslim Forum in Pusad | पुसद येथे राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचा जिल्हास्तरीय मेळावा

पुसद येथे राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचा जिल्हास्तरीय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : आॅल इंडिया एकता फोरम व राष्टÑीय मायनॉरिटी पुरस्कृत राष्टÑीय मुस्लीम मोर्चाच्यावतीने येथील छत्रपती चौकात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचे राष्टÑीय प्रभारी प्रा. विलास खरात होते. उद्घाटन विदर्भ प्रभारी अ‍ॅड. रहेमत अली यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून बुद्धीष्ट इंटरनॅशनल सेंटरचे जिल्हाध्यक्ष भगवान हनवते, राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचे जिल्हा प्रभारी शिवाजी देवसरकर, तालुका प्रभारी संतोष सुरवाडे, भीम शक्तीचे सुरज हाडसे, जमाते इस्लामीचे अब्दूल हकीम शेख, मुफ्ती शफीक कासमी, मिलिंद हट्टेकर, शिवधर्मचे प्रमोद जाधव, राष्टÑीय आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष गणपतराव गव्हाळे, नाझरीन चर्चचे विश्वास मुजमुले उपस्थित होते.
यावेळी अ‍ॅड. रहेमत अली म्हणाले, एसटी, एससी, ओबीसींना विकासापासून वंचित ठेवण्याचे काम वर्तमान सरकार करीत आहे. सत्तापिपासूंच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी बहुजनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी सय्यद, सिदीकोद्दीन, डॉ. वाहीद आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: District-level meeting of the National Muslim Forum in Pusad