जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 06:00 IST2020-01-01T06:00:00+5:302020-01-01T06:00:05+5:30
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची बदली झाल्यानंतर अद्यापही हे पद भरले गेले नाही. या पदाचा प्रभार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. त्यानंतर या विभागातील उपशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाले. ही दोन पदेही अद्याप रिक्तच आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा खेळखंडोबा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा खेळखंडोबा सुरू आहे. या विभागातील सर्वच महत्वाची पदे रिक्त असल्याने कामांवर विपरित परिणाम होत आहे.
तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची बदली झाल्यानंतर अद्यापही हे पद भरले गेले नाही. या पदाचा प्रभार माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. त्यानंतर या विभागातील उपशिक्षणाधिकारी सेवानिवृत्त झाले. ही दोन पदेही अद्याप रिक्तच आहे. शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी ही दोन्ही महत्वाची पदे प्रभारावर असल्याने या विभागाचा खेळखंडोबा सुरू आहे. प्रशासनावर कुणाचाही वचक उरला नाही. परिणामी कर्मचारी बेलगाम झाले आहे.
शिक्षण विभागात कक्ष अधिकाºयाचे एक पदही रिक्त आहे. याशिवाय राजपत्रित अधीक्षकाचे एक पद रिक्त आहे. एक अधीक्षक कार्यरत आहे. मात्र त्यांनीही दीड महिन्यांपूर्वीच स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांनाही येत्या एक-दीड महिन्यात स्वेच्छानिवृत्ती मिळण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे शिक्षण विभागातील सर्वच महत्वाची पदे रिक्त होणार आहे. केवळ प्रभार देऊन गाडा हाकलण्याचे काम सुरू आहे. शासन स्तरावरून पदे भरली जात नसल्याने विभागाच्या कामकाजात खोडा निर्माण होत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण राहत नाही. प्रभारी अधिकारी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे एकूणच या विभागाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.
दोन महिन्यांपासून वेतन रखडले
शिक्षण विभागात जबाबदार अधिकारी नसल्याने शिक्षकांचे वेतन रखडले आहे. अद्यापही त्यांना नोव्हेंबरचे वेतन मिळाले नाही. आॅनलाईनमुळे या वेतनात बाधा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचा सर्वात मोठा विभाग म्हणून शिक्षण विभागाची ओळख आहे. या विभागात शिक्षकांसह जवळपास दहा हजार कर्मचारी कार्यरत आहे. मात्र एवढा महत्वाचा विभाग प्रभारावर असल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत आहे.