शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जिल्ह्यात वर्षभरात दीड हजार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:09 IST

राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाने रस्ते गुळगुळीत आणि चकचकीत झाले. यामुळे वाहनांचा वेग वाढला. हा वेग नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघात घडले. यात ३५० जणांचे बळी गेले, तर ५५२ जणांना कायमचे जायबंदी व्हावे लागले.

ठळक मुद्दे३५० बळी : जिल्ह्यात १२ ब्लॅक स्पॉट, रस्ता सुरक्षा अभियान फोल, आजपासून वाहतूक सुरक्षा अभियान

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाने रस्ते गुळगुळीत आणि चकचकीत झाले. यामुळे वाहनांचा वेग वाढला. हा वेग नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघात घडले. यात ३५० जणांचे बळी गेले, तर ५५२ जणांना कायमचे जायबंदी व्हावे लागले.गतवर्षीच्या तुलनेत अपघाताचा आकडा दुपटीने वाढला आहे. २०१८ मध्ये जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघातांची नोंद झाली. हे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोरच उभे ठाकले आहे. रस्ते गुळगुळीत झाल्याने अपघाताची संख्या वाढतच आहे. यामुळे आता वाहन चालकांनी जागृत होण्याची गरज आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात वाहनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात वाहनाचा आकडा चार लाख चार हजार ८९२ वर पोहोचला आहे. मात्र मोजक्यांकडेच चालक परवाना आहे.यावरून वाहनधारकांना चालविण्याचे ज्ञान अपूर्ण असल्याचे स्पष्ट होते. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. काही ठिकाणी रस्त्याच्याकडेला अपघात प्रवणस्थळ, असे फलक दिसतात. कुठे मोठे खड्डे आहेत. राज्य मार्गावर अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा मोठे स्पीड ब्रेकर आहे. काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, रेडीयमही लावण्यात आले. तरीही अपघातांच्या संखेत वाढ होत आहे.बालकांच्या हातात वाहनअनेक पालक १८ वर्षांपूर्वीच पाल्यांच्या हाती वाहन देतात. ही मुले सुसाट वेगाने वाहने चालवितात. यामुळे शहरातील रस्त्यांवर अपघात घडतात. वाहन चालविताना हेल्मेटही वापरले जात नाही. चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर केला जात नाही. हे प्रकार अपघाताला निमंत्रण देतात. वाहतूक शाखेने सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्यांविरूद्ध कंबर कसली. गतवर्षी २४४ वाहनांवर कारवाई झाली. यावर्षी ७२५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.ब्लॅक स्पॉट म्हणजे कायउपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘ब्लॅक स्पॉट’ची व्याख्या जाहीर केली. ज्या स्थळावर सतत तीन वर्षे अपघात झाले, त्यात चारपेक्षा जादा बळी गेले, असे स्थळ म्हणजे ब्लॅक स्पॉट होय. जिल्ह्यात असे १२ ब्लॅक स्पॉट आहेत. यामध्ये वणी पोलीस ठाण्याअंतर्गत ब्राम्हणी फाटा, रेल्वे क्रॉसिंग, मंदर फाटा, शिरपूर मार्गावरील चारगाव चौकी, आर्णीत कोसदनी घाट, पुसदमध्ये उमरखेड रोडवरील गॅस एजंसी पॉर्इंट, उमरखेड येथे विडूळ फाटा, यवतमाळ ग्रामीणमध्ये हिवरीलगतचा भाग, महागाव येथे महागाव ते कलगाव रोड, नांदगव्हाण घाट, पुसद ग्रामीणमध्ये पॉलीटेक्नीक कॉलेज जवळ विठाळा, कळंबमधील चापर्डा या स्थळांचा समावेश आहे.

टॅग्स :Accidentअपघात