शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेने निवडणूक प्राधिकरणाला परवानगी मागितली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST

सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४७ जागांच्या (लिपिक १३३, शिपाई १४) नोकरभरतीला उच्च न्यायालयाने २० आॅगस्ट रोजी दिलासा दिला. १४७ पैकी अनारक्षित १०५ जागा भरण्याची परवानगी दिली. तर आरक्षणाच्या ४२ जागांसाठी संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवून तीन महिन्यात ती पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत वेगवान हालचाली झाल्या.

ठळक मुद्दे१०५ जागांची नोकरभरती : महाविकास आघाडीकडून भरती रोखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उच्च न्यायालयाने १०५ जागा भरण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर जिल्हा बँकेने ही भरती प्रक्रिया पुढे नेऊन पूर्ण करण्यासाठी मंगळवारी सहकार निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याकडे रितसर परवानगी मागितली आहे. मात्र बँकेत निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने ही परवानगी मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे.सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४७ जागांच्या (लिपिक १३३, शिपाई १४) नोकरभरतीला उच्च न्यायालयाने २० ऑगस्ट रोजी दिलासा दिला. १४७ पैकी अनारक्षित १०५ जागा भरण्याची परवानगी दिली. तर आरक्षणाच्या ४२ जागांसाठी संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवून तीन महिन्यात ती पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत वेगवान हालचाली झाल्या. संचालकांनी न्यायालयाचा आदेश असल्याने ही प्रक्रिया पुढे राबवून पूर्ण करण्याचे निर्देश बँक व्यवस्थापन-प्रशासनाला दिले. मात्र व्यवस्थापनाने अमरावतीचे विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखडे यांच्यामार्फत निवडणूक प्राधिकरण पुणे यांना पत्र पाठवून मार्गदर्शन तसेच परवानगी मागितल्याची माहिती आहे. प्राधिकरण ही परवानगी देते का याकडे नजरा लागल्या आहेत. कारण प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दोन दिवसांपूर्वीच ‘लोकमत’शी बोलताना या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात अर्ज करून मार्गदर्शन मागणार असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाला परवानगी मागण्याच्या प्राधिकरणातील हालचाली वेगाने व्हाव्या म्हणून संचालकांच्या सूचनेवरून बँकेने तातडीने परवानगीसाठी निवेदन-अर्ज सहनिबंधकांमार्फत पाठविल्याचे सांगितले जाते.नव्या संचालक मंडळात भरती घेण्यासाठी प्रयत्नजिल्हा बँकेवर अध्यक्ष भाजपचे आहेत. बँकेची संचालक मंडळाची निवडणूक लागली आहे. अनलॉक-४ नंतर ही निवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वात बँक असताना ही नोकरभरती प्रक्रिया पूर्ण होऊ नये असा महाविकास आघाडीचा प्रयत्न दिसतो. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी सहकार मंत्रालय, आयुक्तालय व निवडणूक प्राधिकरणापर्यंत मोर्चेबांधणी केल्याची माहिती आहे. कोणत्याही परिस्थितीत ही भरती आता होऊ नये, त्याऐवजी नव्या संचालक मंडळात ही भरती घेतली जावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची धडपड पहायला मिळते.बैठकीतील गर्भित इशारा खरा ठरतोयरविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ‘आचारसंहितेत ही भरती होते कशी ते पाहू’ असा गर्भित इशारा नेत्यांनी दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बँकेला १०५ जागांची भरती करण्यास परवानगी मिळते का याकडे भरतीतील बेरोजगारांचे लक्ष लागले आहे.गुणच जाहीर नाही, मग भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्याचे शपथपत्र कसे ?जिल्हा बँक नोकरभरती अनुषंगाने लेखी परीक्षा व मौखिक परीक्षा आटोपली आहे. मात्र त्यातील गुण व पात्र उमेदवार, प्रतीक्षा यादी अद्याप जाहीर केली गेली नाही. त्यानंतरही काही महिन्यांपूर्वी बँकेने उच्च न्यायालयाला सादर केलेल्या शपथपत्रात भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितल्याची माहिती आहे. वास्तविक अंतिम पात्रता यादी जाहीरच झाली नाही तर प्रक्रिया पूर्ण झाली कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे शपथपत्र खोटे दिले गेल्याचेही बोलले जाते. याच मुद्यावर न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले काही उमेदवार उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे सांगितले जाते. गुण जाहीर न केल्याने नोकरभरती घेणारी अमरावती येथील सचिन वानखडे यांची महाराष्ट्र एजंसीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

टॅग्स :bankबँक