शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या ६० लाखांची विल्हेवाट

By admin | Updated: October 9, 2016 00:05 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही संचालकांनी कर्मचाऱ्यांच्या कल्याण निधीतील...

संचालकांचा कारनामा : ना ठराव, ना मंजुरी यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही संचालकांनी कर्मचाऱ्यांच्या कल्याण निधीतील तब्बल ६० लाख रुपयांच्या रकमेचे नियमबाह्यरीत्या विल्हेवाट लावल्याची माहिती आहे. हा निधी खर्च करताना ना ठराव घेतला गेला, ना मंजुरी मिळविली गेली. ६० लाखांची विल्हेवाट लागल्याचे उघड झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संचालकांप्रती रोष पहायला मिळतो आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कल्याण निधी म्हणून दरमहा १५ रुपये कपात केली जाते. एवढीच रक्कम बँक स्वत: टाकते. गेल्या आठ-दहा वर्षांपासून या निधीची कपात सुरू आहे. कल्याण निधीची ही रक्कम ६० लाखांच्या घरात पोहोचली होती. मात्र कर्मचाऱ्यांना अंधारात ठेऊन हा निधीही एका बांधकामावर खर्च दाखविण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेचा हनुमाननगर भागात भूखंड आहे. या भूखंडावर सांस्कृतिक केंद्र बांधण्यात आले. त्यावर हा संपूर्ण ६० लाखांचा निधी खर्ची दाखविण्यात आला. या केंद्राला मंगल कार्यालयाचे स्वरूप दिले जाते. सहा ते सात महिन्यांपूर्वी बांधकामाच्या नावाखाली या निधीची विल्हेवाट लावली गेली. आजच्या घडीला कर्मचारी कल्याण निधीच्या खात्यात झिरो बॅलन्स असल्याचे सांगण्यात येते. हा निधी खर्च करण्यासाठी कोणताही ठराव घेतला गेला नाही किंवा कर्मचाऱ्यांची बहुमताने मंजुरी घेतली गेली नसल्याचे बोलले जाते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कल्याण निधीच्या खात्यातील झिरो बॅलन्सची कल्पना मिळू नये यासाठी संचालकांकडून गुप्तताही पाळली गेली. मात्र ही बाब उघड झालीच. त्यामुळे बँकेचे कर्मचारी आक्रमक झाले आहे. या प्रकरणाची ते रितसर तक्रार करुन संचालकांना जाब विचारणार आहे. सांस्कृतिक केंद्र बांधकामासाठी नेमके ६० लाख लागले कसे याचा हिशेब विचारला जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) निवडणुकीसाठी ‘जेटी’कडे याचिका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नऊ वर्षांपासून एकच संचालक मंडळ आहे. या संचालकांचा प्रचंड आर्थिक धुडगुस सुरू आहे. या बँकेची संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी, यासाठी अ‍ॅड. सुरेश भुसे यांनी अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दाखल केली. गैरकारभाराचे पुरावे म्हणून ‘लोकमत’ची वृत्तमालिका तक्रारीसोबत सादर करण्यात आली. त्यावर ६ आॅक्टोबर रोजी सुनावणीही पार पडली.