जिल्ह्यात 58 जणांची कोरोनावर मात, 45 जण नव्याने पॉझेटिव्ह, एकाचा मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 18:26 IST2020-11-03T18:25:24+5:302020-11-03T18:26:04+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.3) एकूण 449 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 45 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 404 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले.

In the district, 58 people overcame the corona, 45 newly positive, one died | जिल्ह्यात 58 जणांची कोरोनावर मात, 45 जण नव्याने पॉझेटिव्ह, एकाचा मृत्यु

जिल्ह्यात 58 जणांची कोरोनावर मात, 45 जण नव्याने पॉझेटिव्ह, एकाचा मृत्यु

यवतमाळ - जिल्ह्यात 58 जणांची कोरोनावर मात, 45 जण नव्याने पॉझेटिव्ह, एकाचा मृत्युयवतमाळ: शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 58 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 45 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये मारेगाव येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.3) एकूण 449 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 45 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 404 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 339 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10335 झाली आहे.  आज 58 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9155 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 348 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 92314 नमुने पाठविले असून यापैकी 91875 प्राप्त तर 439 अप्राप्त आहेत. तसेच 81540 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: In the district, 58 people overcame the corona, 45 newly positive, one died