पुसद येथे दिव्यांगांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST2021-05-23T04:41:44+5:302021-05-23T04:41:44+5:30

पुसद : महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजुदास जाधव ...

Distribution of materials to the disabled at Pusad | पुसद येथे दिव्यांगांना साहित्य वाटप

पुसद येथे दिव्यांगांना साहित्य वाटप

पुसद : महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजुदास जाधव यांच्या आवाहनानुसार शनिवारी राष्ट्रीय दिव्यांग संघ, गोविंदनगर येथे दिव्यांग मुला, मुलींना साहित्य वाटप करण्यात आले.

शिक्षक संघाच्या स्थानिक शाखेतर्फे एक महिन्याचा किराणा, दोन हजार रुपये रोख देण्यात आले. दिव्यांग मुला, मुलींनी गीतगायन केले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष दादाराव देशमुख, सचिव व संचालक तथा शाखा प्रमुख नंदेश चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर मस्के, पुसद अर्बन क्रेडिट सोसायटीचे संचालक किसन भुरके, आफ्रोट संघटनेचे अध्यक्ष भास्कर मुकाडे, रामराव राठोड, लहू पवार, सतीश पवार, पंजाब राठोड, प्रमोद ढाले, रणजित राठोड, रुंदन आडे, राम अवचार पाटील, विष्णू मोटे, महेश चव्हाण, पंडित राठोड आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of materials to the disabled at Pusad