कुपोषित बालकांना किटचे वितरण

By Admin | Updated: August 1, 2015 03:48 IST2015-08-01T03:48:02+5:302015-08-01T03:48:02+5:30

शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील कुपोषित बालकांना किट वाटपाचा कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला.

Distribution of kit to malnourished children | कुपोषित बालकांना किटचे वितरण

कुपोषित बालकांना किटचे वितरण


दारव्हा : शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील कुपोषित बालकांना किट वाटपाचा कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला. यावेळी २३४ बालकांना कुपोषण दूर होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली औषधी व वस्तूचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, तालुका प्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख सुधीर दातीर, प्रा.कमलाकर हनवंते, बापुराव तायडे, धन्नाजी डागा, जिल्हा परिषद सदस्य संगीता इंगोले, पंचायत समिती सदस्य माणिक राठोड, जयश्री मिरासे, नगरसेविका आशा डोंगरे, अजय गाडगे, विनोद राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय राठोड यांनी जिल्ह्यातील एकही बालक कुपोषित राहू नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कुपोषणमुक्त जिल्हा हे आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले. कुपोषित बालकांना वाटण्यात आलेल्या किटमध्ये प्रोटीनेक्स पावडर, कॅल्शियम सायरप मल्टीव्हीटॅमिन सायरप, टोनोफेरॉन सायरप, थ्रेपटीन पावडर, बेन्डेकस सायरप, बिटानिया पावडर, राजगिरा लाडू यासह अनेक वस्तू असून २३४ बालकांना या किटचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख राजू दुधे, धनंजय सारवे, सचिन चिरडे, महेश सावळकर, विनोद वाड्रसवार, माया पवार, ज्योती जारे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Distribution of kit to malnourished children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.