मतदारांत निरुत्साह
By Admin | Updated: October 15, 2014 23:24 IST2014-10-15T23:24:30+5:302014-10-15T23:24:30+5:30
एरव्ही लोकसभा आणि विधानसभा म्हटले की पुसद मतदारसंघात मतदारांची हक्क बजावण्यासाठी उत्कंठा शिगेला असायची. मात्र यावेळी वातावरण चांगले असताना शहरी मतदारांमध्ये मतदानाबाबात निरुत्साह होता.

मतदारांत निरुत्साह
उत्कंठा हरविली : वातावरणात उकाडाही नव्हता
पुसद : एरव्ही लोकसभा आणि विधानसभा म्हटले की पुसद मतदारसंघात मतदारांची हक्क बजावण्यासाठी उत्कंठा शिगेला असायची. मात्र यावेळी वातावरण चांगले असताना शहरी मतदारांमध्ये मतदानाबाबात निरुत्साह होता.
विधानसभेच्या मतदान प्रक्रियेला सकाळी ७ वाजतापासून सुरूवात झाली. सकाळपासूनच तुरळक स्वरूपात मतदार केंद्राकडे जाताना दिसत होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहरराव नाईक यांनी सहकारी संस्था सहायक निबंधक कार्यालयात मतदान केले तर अॅड़ निलय नाईक यांनी गहुली येथे मतदान केले. सकाळी ७ ते ९ वाजताच्या कालावधीत केवळ आठ टक्के मतदान झाले होते.
त्यावरून मतदारांमध्ये कमालीचा निरूत्साह दिसून येत होता. ही परिस्थती पाहता सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदान कढण्याकडे भर दिला. तरी देखील या टक्केवारीत फारशी वाढ झाली नाही. पुसद मतदारसंघातील काही भाग हा संवेदनशील असल्याने पोलीस बारकाईने लक्ष ठेवून होते. सहा संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा कडक पहारा होता. स्थानीक ईटावा वार्डातील नागरिकांनी अचानक मतदानावर बहिष्काराचा पवित्रा घेतला. त्यामुळे येथील
मतदान केंद्रावरही शुकशुकाट दिसून येत होता.
दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे यांनी पुसद येथील विविध केंद्रांना भेटी दिल्या. तुरळक घटना वगळता मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामीण भागातील शेतमजुरांनी दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी मतदान केले. शेतकऱ्यांनीही शेतीकामे आटोपून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
(तालुका प्रतिनिधी)