पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:39 IST2018-05-21T22:39:10+5:302018-05-21T22:39:40+5:30
नळाचे पाणी न आल्याने संतप्त झालेल्या सत्तारुढ गटाच्या नगरसेवकाने नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड करण्याची घटना दिग्रस येथे सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. तसेच पाणीपुरवठा अभियंत्याला धक्काबुक्की केली. या प्रकरणी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : नळाचे पाणी न आल्याने संतप्त झालेल्या सत्तारुढ गटाच्या नगरसेवकाने नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा कार्यालयात तोडफोड करण्याची घटना दिग्रस येथे सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. तसेच पाणीपुरवठा अभियंत्याला धक्काबुक्की केली. या प्रकरणी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मोतीनगर भागात सोमवारी नळाचे पाणी आले नाही. याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक सय्यद अक्रम सै. उमर नगरपरिषद कार्यालयात आले. त्या ठिकाणी त्यांनी पाणीपुरवठा विभागात जाब विचारला. पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता गौरव मांडळे व वॉलमनशी हुज्जत घालणे सुरू केले. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी कार्यालयातील खुर्च्याची फेकाफेक करून टेबलवरील काच फोडला. तसेच कनिष्ठ अभियंत्याला धक्काबुक्की केली. यामुळे नगरपरिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर गौरव मांडळे यांनी दिग्रस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास दिग्रस पोलीस करीत आहे.