शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

६५० हेक्टरवरचे पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:04 AM

तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांनी अक्षरश: तांडव घातले. ६५० हेक्टरमधील गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिके पूर्णत: नष्ट झाली.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : गारा घेऊन शेतकरी तहसीलवर

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांनी अक्षरश: तांडव घातले. ६५० हेक्टरमधील गहू, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिके पूर्णत: नष्ट झाली. कृषी विभागाची यंत्रणा सर्वेक्षणाचे काम करत आहे तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गारा घेऊन बुधवारी तहसील कार्यालयात मदतीसाठी धडक दिली.दारव्हा तालुक्यात सहा हजार ५८९ हेक्टरवर रबीची लागवड झाली आहे. मंगळवारी सायंकाळी अर्धा तास गारपीट झाली. गारा व वादळी पाऊस सोबतच आल्याने पिकाचे नुकसान झाले. अर्ध्या तासात २६ मिमी पावसाची नोंद झाली. नुकसानीच्या सर्वेक्षणात पहिल्या टप्प्यात ६५० हेक्टर बाधित झाल्याचा अहवाल आहे. सर्वाधिक फटका ३८ गावांना बसला. यात शेलोडी, राजूरा, किन्ही वळगी, तरोडा, बिजोरा, बोथ, गौळपेंड, धूळापूर, मुंडळ, बोरी बु., भोपापूर, फुबगाव, भांडेगाव या गावांचा समावेश आहे.४१२ हेक्टरमधील हरभरा पीक, १८८ हेक्टरमधील गहू, १२ हेक्टरवरील केळी फळबाग, १७ हेक्टरमधील संत्रा फळबाग, दोन हेक्टरवरील आंबा फळबाग, २१ हेक्टरमधील भाजीपाला पीक पूर्णत: नष्ट झाले. खोपडी येथील दत्ता राहाणे या शेतकऱ्यांची पाच एकर आंबा बाग, बोथचे सुभाष पांडुरंग डुकरे यांची संत्र्याची ७०० झाडे नष्ट झाली.या नैसर्गिक आपत्तीने हादरलेल्या डोल्हारी जिल्हा परिषद सर्कलमधील शेतकऱ्यांनी गारा, गहू, हरभरा, फळबाग पिकांचे अवशेष घेवून थेट तहसील कार्यालय गाठले. नायब तहसीलदार सरागे यांना निवेदन देवून तत्काळ सर्वेक्षण व मदतीची मागणी केली. यावेळी विनोद राठोड, प्रभाकर राठोड, तुळशीराम मेश्राम, बापुराव गव्हाणे, सुधाकर राठोड, भगवान जाधव, गोविंद जाधव, रमेश आडे, रामहरी जामदकर, मिलिंद ढवळे, रमेश जाधव, मारोती गव्हाणे उपस्थित होते. तालुक्यात युद्धपातळीवर नुकसानीचा सर्वे सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नालंदा भरणे यांनी दिली.आर्णी तालुक्यातही नुकसानआर्णी : तालुक्यातील लोणबेहळ, आबोडा, कवठाबाजार, राणीधानोरा, साकुर, कोसधनी, सेंदूरसनी, अजनखेड परिसरात शेतातील गहू, हरबरा, तिळ, ज्वारी, मक्का पिकांना फटका बसला. गहू गारपिटीने खाली पडला. महसूल विभागाने नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.