नोकरीसाठी नवऱ्याला सोडचिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:04 IST2019-05-30T21:04:01+5:302019-05-30T21:04:55+5:30
नोकरी करणारी महिला म्हणजे मानाचा विषय झाला आहे. मात्र यातीलच काही महिला नोकरी टिकविण्यासाठी, बदली टाळण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. काही परिचारिकांनी तर ‘नोकरीचे गाव बदलू नये’ म्हणून चक्क नवºयाला कागदोपत्री सोडचिठ्ठी दिली आहे.

नोकरीसाठी नवऱ्याला सोडचिठ्ठी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नोकरी करणारी महिला म्हणजे मानाचा विषय झाला आहे. मात्र यातीलच काही महिला नोकरी टिकविण्यासाठी, बदली टाळण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. काही परिचारिकांनी तर ‘नोकरीचे गाव बदलू नये’ म्हणून चक्क नवºयाला कागदोपत्री सोडचिठ्ठी दिली आहे. तर याच परिचारिकांच्या स्पर्धक परिचारिकांनी त्यांचा सख्खा नवरा प्रशासनाला नावानिशी दाखवून दिला आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील बदली प्रक्रिया दरवर्षीच वादग्रस्त ठरते. यंदाची प्रक्रियाही अपवाद नाही. २ जून रोजी सीईओंच्या पुढे समुपदेशनाने बदल्या होणार आहे. तत्पूर्वी बदलीतून सूट मिळविण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी, विशेषत: महिला कर्मचाºयांनी विविध प्रमाणपत्रे सादर केली आहे. मात्र ही प्रमाणपत्रेच बनावट असल्याचा प्रकार पुढे आला आहे. विशेष म्हणजे ही बनवाबनवी दुसरे-तिसरे कोणी नव्हे तर या कर्मचाºयांच्या युनियननेच उघड केली आहे.
महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी युनियनने याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सविस्तर पत्र दिले आहे. विभाग प्रमुखांनी तयार केलेल्या यादीत अनेक त्रुटी असून त्या शेवटपर्यंत दुरुस्तच केल्या जात नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी न्यायालयात जातात. बदलीतून सूट मिळविण्यासाठी अनेक कर्मचाºयांनी बनावट प्रमाणपत्रे जोडली आहे. त्यांची योग्य तपासणी करण्याची मागणी युनियनने केली आहे. मागील वर्षी नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील बदल्या प्रथम करण्यात आल्या. त्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रातील कर्मचाºयांच्या बदल्या कमी झाल्या. यावर्षी प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविण्यापूर्वी सर्व कागदपत्रे कसून तपासावी, नक्षलग्रस्त आणि सर्वसाधारण क्षेत्रातील बदल्यांची टक्केवारी सारखी ठेवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
घाटंजी, राळेगावातील दिले पुरावे
घाटंजी तालुक्यातील एका महिला कर्मचाºयाने बदलीत सूट मिळविण्यासाठी स्वत:ला गर्भाशयाचा कॅन्सर असल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे. प्रत्यक्षात त्यांचे गर्भाशय यापूर्वीच काढून टाकल्याची माहिती सीईओंना स्पर्धक कर्मचाºयांनी दिली आहे. राळेगाव तालुक्यातील महिला कर्मचाºयाने आपण घटस्फोटित असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे. तर यवतमाळ तालुक्यातील एका महिला कर्मचाºयानेही हाच प्रकार केला. मात्र या दोघींचेही पती कायम असून जिल्ह्यातच शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे पुरावे स्पर्धक महिला कर्मचाºयांनी सीईओंना दिले आहे. यासह अनेक महिला कर्मचाºयांच्या कागदपत्रांबाबत संशय असून त्याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.