शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा शेतकऱ्यांना भरपाई मिळणे मुश्कील, ई-पीक नोंदणीत अडचणीच अडचणी

By रूपेश उत्तरवार | Updated: September 8, 2022 13:54 IST

राज्यात ८० लाख शेतकरी सातबाऱ्यांची नोंद आहे.

यवतमाळ : ई-पीकपाहणी सर्वेक्षणासाठी व्हर्जन २ हे नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीकपेरा नोंदवायचा आहे.  परंतु आयटी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत बहुतांश शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे पेरणी झाल्यानंतर तीन महिने लोटले तरी राज्यातील ६१ लाख शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी सर्वेक्षणाची नोंद करता आलेली नाही. यात अमरावती आणि कोकण विभाग सर्वांत मागे पडले आहेत. 

राज्यात ८० लाख शेतकरी सातबाऱ्यांची नोंद आहे. एक कोटी हेक्टर खरिपाखालील लागवड क्षेत्र आहे. साधारणतः १५ सप्टेंबरनंतर सातबाऱ्यावर पीकपेरा चढविला जातो. यासाठी ई-पीकपाहणी सर्वेक्षणाचा आधार घेतला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली नोंद केली अशा शेतकऱ्यांच्याच सातबाऱ्यावर पिकाचे क्षेत्र ई-पीकपाहणी सर्वेक्षणावरून नोंदविले जाणार आहे. राज्यात आतापर्यंत १९ लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी ई-पीकपेरा नोंदविला आहे. 

६१ लाख शेतकरी सर्वेक्षणापासून दूर आहेत. याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे अनेकांकडे स्मार्ट फोन नाही. ज्यांच्याकडे फोन आहे त्यांची स्टोरेज कॅपेसिटी कमी आहे. यामुळे ई-पीकपाहणी सर्वेक्षणाचे व्हर्जन २ डाउनलोड करताना अडचणी येत आहेत. काहींना आयटी तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नाही.

- नुकसानीची मदत मिळण्यात अडचणी येणाऱ्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढताना दर्शविलेले क्षेत्र सातबाऱ्यावर नसेल तर शेतातील पेरणी निरंक भासेल. - यामुळे नुकसानीच्या काळात कुठल्या पिकाचे नुकसान झाले हे न कळाल्याने मदत मिळणार नाही, तर दुसरीकडे हमी केंद्रावर शेतमाल विकताना पेराक्षेत्र किती आहे हे पाहिले जाणार आहे. - यानंतर हमी केंद्रात शेतमालाची खरेदी होणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांसाठी याचा अवलंब होणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा