डीएफओ धडकले जंगलात
By Admin | Updated: July 1, 2014 23:44 IST2014-07-01T23:44:00+5:302014-07-01T23:44:00+5:30
महागाव तालुक्यातील शिरपुली जंगलातील सागवानाची चोरटी वाहतूक रेतीच्या ट्रकमधून होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच उपवनसंरक्षकासह अधिकारी शिरपुली जंगलात पोहोचले.

डीएफओ धडकले जंगलात
रेतीआड सागवान चोरी : शिरपुली जंगलातील वृक्ष कत्तलीची पाहणी
फुलसावंगी : महागाव तालुक्यातील शिरपुली जंगलातील सागवानाची चोरटी वाहतूक रेतीच्या ट्रकमधून होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच उपवनसंरक्षकासह अधिकारी शिरपुली जंगलात पोहोचले. कत्तल झालेल्या सागवानाची पाहणी केली. वनरक्षकाच्या बेजबाबदारपणाबाबत खंत व्यक्त करीत चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
महागाव तालुक्यातील शिरपुली जंगलात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. या सागवानाची वाहतूक रेतीच्या ट्रकमधून केली जात आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशित केले. त्यामुळे वनविभाग खडबडून जागा झाला. पुसद उपवनसंरक्षक एस.व्ही. आलुरवार, सहायक वनरक्षक कैलास राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजीराव नाईकवाडे यांच्यासह वनपाल आणि वनरक्षक जंगलात धडकले. दोन दिवसांपासून जंगलाची पाहणी सुरू आहे. शिरपुली बिटमधील कंपार्टमेंट ४८० मध्ये वनाधिकाऱ्यांनी पाहणी केली असता तोडलेले सागवान आढळले. यावेळी त्यांनी खंत व्यक्त केली. या वेळी वनपाल रत्नपारखी, इंगोले, रवी तानेकर, अर्जून राठोड आदी उपस्थित होते. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वनरक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन उपवनसंरक्षक एस.डी. आलुरवार यांनी दिले. (प्रतिनिधी)