हातोला येथे विकास कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST2021-07-25T04:34:53+5:302021-07-25T04:34:53+5:30
फोटो दारव्हा : तालुक्यातील हातोला येथे विविध योजनेतून मंजूर एक कोटी ३३ लाख रुपयांची विकासकामे केली जात आहे. यापैकी ...

हातोला येथे विकास कामांना सुरुवात
फोटो
दारव्हा : तालुक्यातील हातोला येथे विविध योजनेतून मंजूर एक कोटी ३३ लाख रुपयांची विकासकामे केली जात आहे. यापैकी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व नवीन कामांचे भूमिपूजन आमदार संजय राठोड यांच्या हस्ते पार पडले.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा यशवंत पवार होत्या. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, सरपंच सदाशिव कापडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आमदार संजय राठोड यांनी हातोलासह संपूर्ण मतदार संघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम बनविणे, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कालिंदा पवार, श्रीधर मोहोड यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पाणीपुरवठा योजना, रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण, दहन शेड आदींचे लोकार्पण आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, जलशुद्धीकरण यंत्र व एटीएमच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख मनोज सिंगी, पंचायत समितीचे माजी सभापती एस.पी. राठोड, शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण भगत, छत्रपती शेळके, अजय गाडगे, प्रेमसिंग चव्हाण आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
240721\img-20210716-wa0006.jpg
हातोला येथे भुमीपुजन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना आमदार संजय राठोड व इतर मान्यवर