महिलांनी कष्टाने उभी केलेली शेती उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:00:33+5:30

शासनाच्या हाकेला ओ देत रुढा गावातील महिलांनी शेवगा शेती करुन २६५ वृक्षाची जोपासना केली. मोठ्या कष्टाने त्यांनी शेतीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले होते. पदरमोड करुन २५ हजारांच्या आसपास खर्च केला. शेतीतून चार पैसे पदरात पडतील, अशी आशा निर्माण झाली. परंतु त्यांचं हिरवं स्वप्न धुळीस मिळालं.

Destroyed agriculture by women | महिलांनी कष्टाने उभी केलेली शेती उद्ध्वस्त

महिलांनी कष्टाने उभी केलेली शेती उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देदारुबंदीच्या भूमिकेने केला घात : रुढा गावातील घटनेने चीड, शेवग्याची झाडे अज्ञातांनी कापून फेकली

गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : गावखेड्यातील दहा महिला एकत्र आल्या. सामूहिक शेतीचा संकल्प त्यांनी केला. प्रत्येकीने तळपत्या उन्हात भविष्याची सोनेरी स्वप्न पाहून मातीत घाम गाळला. त्यातून शेवगा शेती केली. परंतु दारुविके्रत्यांनी त्यांची शेतीच उद्ध्वस्त केली. हा संतापजनक प्रकार रुढा गावात सोमवारी रात्री घडला.
शासनाच्या हाकेला ओ देत रुढा गावातील महिलांनी शेवगा शेती करुन २६५ वृक्षाची जोपासना केली. मोठ्या कष्टाने त्यांनी शेतीतून उत्पन्नाचे साधन निर्माण केले होते. पदरमोड करुन २५ हजारांच्या आसपास खर्च केला. शेतीतून चार पैसे पदरात पडतील, अशी आशा निर्माण झाली. परंतु त्यांचं हिरवं स्वप्न धुळीस मिळालं.
या चीड आणणाऱ्या प्रकाराला सूडबुध्दीची किनार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी प्रामाणिकपणे जनजागृतीचे कार्य केले. यात जागृती बचत गटाच्या महिलाही मागे नव्हत्या. गावात कुठलाही धोका होऊ नये, यासाठी महिलांच्या पुढाकारात दारूबंदीची घोषणा करण्यात आली. गावासोबतच बाहेरगावचे पण लोकं रुढामध्ये दारु पिण्यासाठी यायचे. त्यामुळे गावातील नागरिकांना कोरोना होऊ नये, यासाठी दारुबंदी केली.
परंतु विनंती करूनही कोणी दारुविक्री थांबविली नाही. त्यामुळे महिलांनी स्वत: दारुविक्री बंद पाडली. पोलिीसांना दारू पकडून दिली. याचाच राग म्हणून दारुविके्रत्यांनी महिलांच्या सामूहिक शेतातील पाणी देणाºया मोटारचे पाईप कापले. पण महिलाही खचून गेल्या नाही. त्यांनी हार न मानता हिमतीने डोक्यावरुन गुंडांनी पाणी दिले. महिला असूनही हार मानायला तयार नसल्याने दारुविक्रेते आणखी बैचेन झाले. आता तर त्यांची चक्क शेवग्याची झाडेच कापून टाकली. यात शेताचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या प्रकारामुळे महिलांना मोठा धक्का बसला. या घटनेची तक्रार अश्विनी घोंगडे यांनी कळंब पोलिसात केली. प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण महिलांच्या विकासाला खीळ
कष्टातून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ग्रामीण महिलांना उभारी देण्याचे काम करण्याऐवजी त्यांचे पंख छाटण्याचे पाप या काही लोकांनी केले. येणाºया काळात या महिला शेतीपूरक इतर व्यवसायातही यशस्वी ठरु शकल्या असत्या. परंतु त्यांना उभारी न देता मागे खेचण्याचे काम करण्यात आले. आता या महिला पुरत्या खचून गेल्या आहे. त्यांना खऱ्या अर्थाने आता आर्थिक मदतीची गरज आहे.

Web Title: Destroyed agriculture by women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.