शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

ठराव होऊनही करंजीचे कर्मचारी जागीच

By admin | Updated: September 29, 2016 01:17 IST

जिल्ह्यातील करंजी रोड (ता. पांढरकवडा) येथे ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती झाली. तेथील आरोग्य केंद्र वाई येथे हलविण्यात आले.

वाई केंद्र बंदच : आरोग्य समिती झाली हतबलयवतमाळ : जिल्ह्यातील करंजी रोड (ता. पांढरकवडा) येथे ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती झाली. तेथील आरोग्य केंद्र वाई येथे हलविण्यात आले. मात्र अद्याप सर्व कर्मचारी करंजी येथेच असून वाई केंद्र सुरू झाले नाही. वारंवार वरिष्ठांशी संपर्क साधूनही केंद्र बंद असल्याने जिल्हा परिषदेची आरोग्य समिती हतबल झाली आहे.करंजी रोड येथे काही महिन्यांपूर्वी ग्रामीण रूग्णालयाची निर्मिती करण्यात आली. परिणामी तेथील आरोग्य केंद्र लगतच्या वाई येथे हलविण्याचा ठराव समितीने पारित केला. त्यानुसार वाई येथील एका समाज मंदिरात केंद्र सुरू करण्याचे ठरविण्यात आले. मात्र शासन वाई येथे स्वतंत्र वास्तू नसल्याने कर्मचारी पाठविण्यास तयार नाही. परिणामी वाई येथील केंद्र अद्याप बंद असून सर्व कर्मचारी करंजी येथेच बसून असतात. त्यामुळे आरोग्य समिती हतबल झाली आहे.आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेत बुधवारी समितीची बैठक झाली. त्यावेळी हे सत्य उजागर झाले. बैठकीत आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील रिक्त जागांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या २६ जागा रिक्त आहे. नव्याने १४ वैद्यकीय अधिकारी जिल्ह्यात येणार असून त्यापैकी प्रत्यक्षात किती रूजू होतात, यावरही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात सध्या व्हायरल फिव्हरची लागण झाली असून कोणतीही साथ नसल्याचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकाम दुरुस्तीला बैठकीत मंजूरी देण्यात आली. त्यासाठी विविध शिर्षकांखाली निधीची तरतूद करण्यासंदर्भातही चर्चा झाली. (शहर प्रतिनिधी)वेगावचे केंद्र दोन खोलीतमारेगाव तालुक्यातील वेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वास्तूचे बांधकाम गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूच आहे. तूर्तास तेथे दोन खोल्यांमध्ये केंद्राचे कामकाज सुरू आहे. वेगावप्रमाणेच वाई येथे समाज मंदिरामध्ये केंद्र सुरू करावे, असा ठरावही पारित करण्यात आला. वारंवार ठराव पाठवून आरोग्य विभाग दाद देत नसल्याने खुद्द सभापतीही जेरीस आले आहे. त्याचप्रमाणे उपकेंद्र बांधकामासाठी शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याबद्दलही सभापती नरेंद्र ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.