शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

उद्धवसेनेकडून वणीत देरकर तर दिग्रसमधून संजय राठोड मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 18:10 IST

Yavatmal : पुसद विधानसभा मतदारसंघातून इंद्रनील नाईक यांची उमेदवारी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भाजपने विधानसभेचे तीन उमेदवार जाहीर करून आघाडी घेतल्यानंतर आता उद्धवसेनेच्या वतीने वणी मतदारसंघात संजय देरकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने इंद्रनील नाईक तर दिग्रस विधानसभा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने संजय राठोड पुन्हा मैदानात उतरले आहेत. राठोड यांची ही पाचवी निवडणूक तर इंद्रनील यांची दुसरी निवडणूक राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने यवतमाळ मतदारसंघातून मदन येरावार, राळेगाव मतदारसंघातून अशोक उईके तर वणी मतदारसंघातून संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. आर्णी आणि उमरखेड या दोन मतदारसंघातील उमेदवारांची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असले तरी पक्षाच्या वतीने उमेदवारी कोणाला जाहीर होते. 

याबाबत कमालीची उत्सुकता आहे. भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने इंद्रनील नाईक यांची उमेदवारी जाहीर झाली. तर रात्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने दिग्रस मतदारसंघातून पुन्हा संजय राठोड यांना मैदानात उतरविण्यात आले. महायुतीचे पाच उमेदवार जाहीर झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबतही जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता आहे. बुधवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील उद्धवसेना पक्षाची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये वणी विधानसभा मतदारसंघातून संजय देरकर यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. 

आता उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या घोषणेकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी काँग्रेसचीही पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात बहुरंगी लढतीचे संकेत

  • जिल्ह्यात सातही विधानसभा मतदारसंघात यावेळी बहुरंगी लढती रंगण्याचे संकेत मिळत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरो- बरच इतर पक्षही मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातही विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.
  • उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्यास विलंब होत असल्याने शेवटच्या दिवसात उमेदवारी दाखल करण्यासाठीही निवडणूक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे

आता काँग्रेसच्या उमेदवार यादीकडे जिल्ह्याचे लक्षसंजय राठोड यांनी यापूर्वी चार विधानसभा निवडणुका लढल्या असून आता पाचव्या वेळी ते मैदानात उतरले आहे. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीतर्फे कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे. तर संजय देरकर यांनीही यापूर्वी चार निवडणुका लढल्या आहेत. १९९९ मध्ये पहिल्यांदा ते राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विधानसभेच्या मैदानात उतरले होते. २००९ ची विधानसभा त्यांनी अपक्ष म्हणून लढली. २०१४ च्या निवडणुकीत ते पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले होते. या निवडणुकीत त्यांनी ३१ हजार २२१ मते मिळविली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना त्यांनी २५ हजारांवर मते खेचली होती. पुसद विधानसभेच्या रिंगणात उतरलेले इंद्रनील नाईक यांची ही दुसरी निवडणूक ठरणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत इंद्रनील यांनी ८९ हजार १४३ मते घेत भाजपचे उमेदवार नीलय नाईक यांचा पराभव केला होता. नीलय नाईक यांना ७९ हजार ४४२ इतकी मते मिळाली होती. इंद्रनील नाईक यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार राहतो, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. इतर पक्षांनीही मैदानात उतरण्याची तयारी सुरू केल्याने बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होण्याचे संकेत आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४pusad-acपुसदSanjay Rathodसंजय राठोडyavatmal-acयवतमाळwani-acवणीdigras-acदिग्रस