प्रादेशिक मत्स्य कार्यालयाची तोडफोड
By Admin | Updated: July 1, 2014 23:42 IST2014-07-01T23:42:26+5:302014-07-01T23:42:26+5:30
एका तलावाच्या ठेका प्रकरणाचा वाद चांगलाच चिघळला असून काही तरूणानी येथील प्रादेशिक मत्स्य विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय

प्रादेशिक मत्स्य कार्यालयाची तोडफोड
कंत्राटाचा वाद : कर्मचाऱ्यांची घेतली पोलीस ठाण्याकडे धाव
यवतमाळ : एका तलावाच्या ठेका प्रकरणाचा वाद चांगलाच चिघळला असून काही तरूणानी येथील प्रादेशिक मत्स्य विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीतील कार्यलयात सकाळी ११ वाजता घडली. कक्षाच्या काचा फोडून टेबल आणि खुर्च्यांची फेकाफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकाराची यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
यवतमाळ तालुक्यातील उमर्डा तलावाचा मासेमारीचा ठेका तिवसा येथील मच्छींद्रनाथ सहकारी संस्थेला देण्यात आला होता. एका संस्थेला पाच वर्षे कंत्राट नियमानुसार देता येते. मात्र दोन वर्षे पूर्ण झाल्याने तिसऱ्या वर्षाचे कंत्राट मच्छींद्रनाथ सहकारी संस्थेला देण्यात आले. तसेच त्यांच्याकडून कराराची रक्कम घेण्यात आली होती. मात्र गहुली हेटी येथील वसंतराव नाईक मासेमारी सहकारी संस्थेवर आक्षेप घेतला. पुन्हा त्याच संस्थेला कंत्राट का दिले म्हणून वाद सुरू झाला. मंगळावारी सकाळी ११ वाजताच्या सुमार काही तरुण हातात काठ्या घेऊन कार्यालयात शिरले. त्यांनी प्रादेशिक उपायुक्तांच्या कक्षाच्या काचा फोडल्या. टेबल, खुर्च्यांची फेकाफेक केली. तसेच फाईलांची फेकाफेक केली. याप्रकरणी प्रादेशिक मत्स्य उपायुक्त कार्यालयाने संदेश राठोड आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांविरोधात शहर पोेलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
दूरध्वनीवरून भरला दम
संदेश राठोड यांनी याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला दूरध्वनीवरून हा ठेका का दिला, याचे गंभीर परिणाम होतील असा दम दिला होता. मी आपल्या कार्यालयात येणार आहे असे संबंधिताने म्हटल्याचे त्या कर्मचाऱ्यांने सांगितले. (शहर वार्ताहर)