शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अखेरच्या दिवशी उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: October 13, 2014 23:26 IST

गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी शक्ती प्रदर्शन करित सातही मतदारसंघातील उमेदवारांनी रॅली काढली. जनमताचा भक्कम पाठिंबा मिळत

प्रचारतोफा थंडावल्या : गोपनीय प्रचार सुरू, आमिषांची सरबत्ती यवतमाळ : गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी शक्ती प्रदर्शन करित सातही मतदारसंघातील उमेदवारांनी रॅली काढली. जनमताचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र उभे करण्याची धडपड शेवटच्या क्षणापर्यंत करण्यात आली. आता गठ्ठा मतांवर लक्ष केंद्रीत करून आमिषांची सरबत्ती उमेदवारांकडून केली जात आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच निवडणुकीचे चित्र पालटल्याचा इतिहास आहे. त्यामुळेच आज रिंगणात असलेल्या सर्वच प्रमुख उमेदवारांनी गेल्या १५ दिवसांपासून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची कसोटी लागली होती. उमेदवारांनी काढलेल्या रॅलीची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आपापल्या परीने होत आहे. शेवटच्या दिवशी काढण्यात आलेली रॅलीही काठावरची मते आपल्या बाजुने वळविण्याचा प्रयत्न असतो. यानंतर खऱ्या अर्थाने शेवटची बोलणी सुरू होते. त्यासाठी मतदानाच्या दिवसापर्यंंत उमेदवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्नांची शर्थ केली जाते. जिल्ह्यातील सातही विधानसभेत लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, प्रमुख उमेदवार आपला जोरकस आजमावत आहे. वणी विधानसभेत काँग्रेसचे वामनराव कासावार, शिवसेनेकडून विश्वास नांदेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय देरकर, भारतीय जनता पार्टीकडून संजयरेड्डी बोदकुरवार, मनसेकडून राजू उंबरकर यांच्यात चुरस आहे. राळेगावमध्ये काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके, भाजपाचे अशोक उईके, शिवसेनेचे उत्तम मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद धुर्वे यांच्यात लढत आहे. यवतमाळ विधानसभेत काँग्रेसचे राहुल ठाकरे, भाजपाचे मदन येरावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप बाजोरिया, शिवसेनेचे संतोष ढवळे आणि बसपाचे मो. तारीक मो. समी यांच्यात लढत आहे. शिवाय शेतकरी विकास आघाडीचे डॉ. रवींद्र देशमुखही रिंगणात आहेत. दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत घुईखेडकर, काँग्रेसचे देवानंद पवार अशी लढत आहे. आर्णी मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव मोघे, भाजपाचे राजू तोडसाम, शिवसेनेचे संदीप धुर्वे, राष्ट्रवादीचे विष्णू उकंडे यांच्यात चुरस आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादीचे मनोहरराव नाईक, काँग्रेसचे सचिन नाईक, शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांच्यात लढत आहे. उमरखेडमध्ये काँग्रेसचे विजय खडसे, भाजपाचे राजेंद्र नजरधने, शिवसेनेचे शिवशंकर पांढरे, राष्ट्रवादीचे मोहन मोरे, बसपाचे नारायण पाईकराव यांच्यात लढत आहे. या सर्व उमेदवारांकडून आता शेवटच्या ४८ तासात मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जाणार आहे. निवडणुकीतील वैऱ्याची रात्र म्हणून उमेदवारासोबतच प्रत्येक कार्यकर्ता दक्ष असतो. मोठ्या प्रमाणात या ४८ तासांमध्ये घडामोडींना वेग येतो. मतदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर याकाळात दबाव वाढतो. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)