महेश वाघ यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 21:59 IST2017-12-20T21:58:20+5:302017-12-20T21:59:19+5:30

बाभूळगाव तालुक्याच्या देवगाव येथील डॉ. महेश मोहनराव वाघ यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी पोलीस पाटील तथा डॉ. वाघ यांचे वडील मोहनराव शेषरावजी वाघ यांनी कळंब ठाणेदारांना निवेदन देण्यात आले आहे.

Demand for inquiry of Mahesh Wagh's death | महेश वाघ यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

महेश वाघ यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

ठळक मुद्देबाभूळगाव तालुक्याच्या देवगाव येथील डॉ. महेश मोहनराव वाघ यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बाभूळगाव तालुक्याच्या देवगाव येथील डॉ. महेश मोहनराव वाघ यांच्या मृत्यूची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी पोलीस पाटील तथा डॉ. वाघ यांचे वडील मोहनराव शेषरावजी वाघ यांनी कळंब ठाणेदारांना निवेदन देण्यात आले आहे.
मुलगा डॉ. महेश (३५), त्याची पत्नी पायल (२७) आणि दोन वर्षांचा मुलगा हे तिघे २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मोटरसायकलने हिवरा(दरणे) येथून बाभूळगावला येत होते. पार्डी फाट्याजवळ रस्त्यावर दुचाकी उभी करून महेशने विहिरीत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार आत्महत्येचा नसून घातपात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मोहन वाघ यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह पोलीस विभागाच्या वरिष्ठांना पाठविण्यात आल्या आहे.

Web Title: Demand for inquiry of Mahesh Wagh's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.