शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

भारतीय सोयाबीनला इराणमधून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 2:25 PM

भारतीय सोयाबीनला इराणमधून मागणी वाढली आहे. परिणामी सोयाबीनचे दर वधारले असून तूर्तास प्रती क्विंटल तीन हजार ६८० रुपयांचा भाव मिळत आहे.

ठळक मुद्देदर वधारले प्रती क्विंटल ३६८० रूपये

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतीय सोयाबीनला इराणमधून मागणी वाढली आहे. परिणामी सोयाबीनचे दर वधारले असून तूर्तास प्रती क्विंटल तीन हजार ६८० रुपयांचा भाव मिळत आहे.इराणकडून सोयाबीनची मागणी वाढताच राज्यातील बाजारपेठेत सोयाबीनचे दर वधारले. त्यामुळे दर हमीदरापेक्षा प्रती क्विंटल २८० रूपयांनी जादा दर मिळत आहे. यावर्षी प्रारंभी चिनकडून भारतीय सोयापेंड खरेदीची मागणी आली. त्यामुळे सोयाबीनचे दर गतवर्षीच्या तुलनेत वाढले. दरम्यान, अमेरिकेने इराणावर निर्बंध लादले आहे. यामुळे इराणने कच्च्या तेलाच्या मोबदल्यात भारताकडून सोयापेंड, साखर आणि तांदूळ खरेदीसाठी होकार दिला. गेल्या काही दिसांपासून इराणनने भारताकडून सोयाबीन खरेदी सुरू केली. तसेच पशुखाद्यासाठी सोयापेंडची मागणी होत आहे. यामुळे खुल्या बाजारात सोयाबीनचे दर हमीदराच्यावर गेले आह.केंद्र शासनाने सोयाबीलना तीन हजार ३९९ रूपये प्रती क्विंटलचे दर जाहीर केले होते. प्रथम व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून दोन हजार ५०० ते दोन हजार ८०० रूपयांपर्यंत सोयाबीन खरेदी केले. त्याच सुमारास मोठ्या प्रमाणात खेडा खरेदी झाली. दिवाळीच्या सुमारास सोयाबीनचे दर वधारले अन् काही दिवसांतच पुन्हा ते घसरले. आता इराणने मागणी करताच सोयाबीनचे दर पुन्हा वधारले आहे.सध्या अकोला जिल्ह्यातील कारंजा बजारपेठेत तीन हजार ६८० रूपयांपर्यंत सोयाबीनला प्रती क्विंटलचे दर मिळत आहे. यवतमाळच्या बाजारात तीन हजार ६२० रूपये दर मिळत आहे. अर्थात सोयाबीनचे दर क्विंटलमागे २८० रूपयांनी वधारले आहे.दर वाढीचा लाभ व्यापाऱ्यांनाचसोयाबीनचे दर वधारले असले, तरी तयाचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन यापूर्वीच व्यापाऱ्यांना विकले आहे. त्यामुळे दर वधारल्याचा लाभ व्यापाऱ्यांनाच मिळणार आहे. केवळ दरवाढीच्या अपेक्षेने वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवणाऱ्या मोजक्याच शेतकऱ्यांना या दरवाढीचा लाभ होणार आहे.

टॅग्स :agricultureशेती