अश्लील काव्य करणाऱ्या कवीवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:34 IST2018-10-16T22:32:11+5:302018-10-16T22:34:59+5:30
मुंबई विद्यापीठाअंतर्गत बीए मराठी विषयासाठी ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कविता संग्रहात आदिवासी मुलीवर अश्लील व्यंग करणाऱ्या कवी दिनकर मनवर मालवन व प्रकाशकावर अॅक्ट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केली.

अश्लील काव्य करणाऱ्या कवीवर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : मुंबई विद्यापीठाअंतर्गत बीए मराठी विषयासाठी ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कविता संग्रहात आदिवासी मुलीवर अश्लील व्यंग करणाऱ्या कवी दिनकर मनवर मालवन व प्रकाशकावर अॅक्ट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने केली.
एकीकडे स्त्रीयांना देवी समजून पुजायचे अन् दुसरीकडे तिच्यावर अश्लील शेरेबाजी करायची ही विकृत मानसिकता समाजाला जडलेला रोग आहे. या रोगाचा नायनाट करण्यासाठी शासन व्यवस्था कधी पाऊल उचलणार, असा प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आला. शासनाने या प्रकरणात तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. निवेदनावर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे तालुकाध्यक्ष सहदेव पवार, तालुका संयोजिका अंजली साखरकर, नगरसेविका जयश्री खरोडे, अॅड.रूपेश कठाणे, बहुजन कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय बिहाडे, बिरसा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष संतोष घोरसडे, आदिवासी विकास परिषदेचे रामहरी ठाकरे, महिला संघाच्या तालुका संयोजिका वनिता मानतुटे, ज्योत्स्ना कमलाकर पवार, आदिवासी एकता परिषदेचे सुभाष वाडगे, मारोती पारधी, नंदकुमार खरबडे, दिगांबर पारधी, गोविंदराव खरोडे, बहुजन कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र वाकोडे आदींसह बहुजन बांधव उपस्थित होते.