वीजपुरवठ्याला विलंब, कंपनीला दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 07:34 IST2025-10-20T07:34:22+5:302025-10-20T07:34:22+5:30
अधिकाऱ्यांना वारंवार भेटून, अर्ज, निवेदन देऊनही जोडणी देण्यात आली नव्हती.

वीजपुरवठ्याला विलंब, कंपनीला दंड
लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ : कृषिपंपाच्या वीजपुरवठ्याचा अर्ज जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचा ठपका ठेवत वीज कंपनीला २९३२ दिवस २०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात दाखल प्रकरणात हा आदेश देण्यात आला.
एका महिन्यात वीजपुरवठा देण्यात यावा, असेही यात नमूद करण्यात आले आहे. राळेगाव तालुक्यातील पिंपरी (सा) येथील नथ्थू डोमा देहारकर यांनी शेतात वीजपुरवठ्यासाठी ३० ऑगस्ट २०१७ रोजी वीज कंपनीच्या राळेगाव कार्यालयाकडे अर्ज केला. १ सप्टेंबर २०१७ रोजी तो मंजूर झाला.
कंपनीच्या सूचनेनुसार, ३ ऑक्टोबर २०१७ रोजी ६७४८ रुपयांचा भरणाही केला. टेस्ट रिपोर्टही दिला. परंतु, कंपनीने वीज जोडणी दिली नाही. अधिकाऱ्यांना वारंवार भेटून, अर्ज, निवेदन देऊनही जोडणी देण्यात आली नव्हती.