लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाहनांवर गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली. या घटनेचा दिग्रस तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आरपीआयने निषेध व्यक्त करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना दिले.गुजरातमध्ये महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार राहुल गांधी ५ आॅगस्टला बनारसकाटा येथे गेले होते. तेथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांवर दगडफेक करून काच फोडले. या घटनेचा तालुका काँग्रेस, आरपीआयने निषेध केला. दोषींवर कठोर कारवाईची मागणी तहसीलदार किशोर बागडे यांच्यामार्फत जिल्हाधिकाºयांकडे केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजा चौहान, तालुकाध्यक्ष वसंतराव निरपासे, सुनील वानखडे, राजीव मोघे, जिल्हा सरचिटणीस विजय घाटे, नगरसेवक किशोर साबू, भारत देशमुख, अॅड.सुधाकर जाधव, अरुण राठोड, राहुल वानखडे, मो.साबीर, सलीम पटेल, शंकर जाधव, अॅड.दत्ता खंडारे, इफ्तेखार खान, गणेश रोकडे, बबन इंगोले, मुरलीधर कांबळे, शांताराम वानखडेकर, लालसिंग राठोड, शेख इस्माईल शेख बशीर, गौतम गवळे, जावेद परसुवाले, राजेश चव्हाण, कैलास चव्हाण, एन.एस.पठाण, भी.वा.पवार, कुद्दुस, दिनेश सुकोडसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दिग्रस काँग्रेसचे एसडीओंना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:11 IST
अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाहनांवर गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली.
दिग्रस काँग्रेसचे एसडीओंना निवेदन
ठळक मुद्देराहूल गांधींवरील हल्याचा निषेध : दोषींवर कठोर कारवाईची मागणी