पहाटेच चोरले डेकोरेशन साहित्य, चोरणारा अन् घेणाराही अडकला
By विलास गावंडे | Updated: August 16, 2023 18:16 IST2023-08-16T18:13:46+5:302023-08-16T18:16:32+5:30
वडकी पोलिसांची कारवाई

पहाटेच चोरले डेकोरेशन साहित्य, चोरणारा अन् घेणाराही अडकला
वडकी (यवतमाळ) : राळेगाव तालुक्यातील खैरी येथील एका डेकोरेशन व्यवसाईकाच्या गोडावूनमधून साहित्य चोरणाऱ्या दोन संशयितांना वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी गेलेले साहित्य जप्त करण्यात आले. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली.
रमेश अजाब आत्राम (रा. खैरी), असे साहित्य चोरणाऱ्याचे, तर विलास सरजू वाईकर, असे हे साहित्य घेणाऱ्याचे नाव आहे. खैरी येथील राहुल वडपल्लीवार यांच्या वडकी रोडवरील गोडावूनच्या शटरचे कुलूप तोडण्यात आले. त्यातील जवळपास ११ हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप चोरुन नेण्यात आले. हे संपूर्ण लोखंडी साहित्य गावात भंगार घेणारा विलास सरजू वाईकर याला विकले. हा प्रकार लक्षात येताच वडकी पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवून दोघांनाही ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.