महागाव तालुक्यात कर्ज वाटप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:43 AM2021-05-09T04:43:02+5:302021-05-09T04:43:02+5:30

खरीप हंगामाकरिता तालुक्यातील २४ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी ३ हजार ७४२ शेतकरी सभासदांना २२ कोटी ७८ लाखांचे पीक कर्जवाटप ...

Debt distribution started in Mahagaon taluka | महागाव तालुक्यात कर्ज वाटप सुरू

महागाव तालुक्यात कर्ज वाटप सुरू

Next

खरीप हंगामाकरिता तालुक्यातील २४ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी ३ हजार ७४२ शेतकरी सभासदांना २२ कोटी ७८ लाखांचे पीक कर्जवाटप केले आहे. कोरोनाकाळात शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी चकरा मारू न देता वेळेत कर्जवाटप करून दिलासा देण्यात आला. त्यामुळे शेतकरी बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यास मोकळे झाले आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाले असले तरी यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना वेळेत व कुठलाही अनाठायी वेळ आणि खर्च न लागू देता कर्जाचे वाटप केले. मात्र, पोहंडुळ, हिवरा, मोरथ, चिलगव्हाण या चार सोसायट्या कर्जवाटपात माघारल्या आहेत. या सोसायट्यांमार्फत लवकरच कर्ज वाटप केले जाणार असल्याचे जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी सुरेश भरवाडे यांनी सांगितले.

दरम्यान, आतापर्यंत २५ शेतकरी सभासदांना २२ लाखांचे पीक कर्जवाटप केल्याचे एसबीआयचे व्यवस्थापक संदीप हुकरे यांनी सांगितले. काळी दौलत सर्कलमध्ये सर्वाधिक कर्ज वितरण करणाऱ्या युनियन बँकेनेसुद्धा कर्ज वितरण सुरू केले आहे.

बॉक्स

६८ हजार हेक्टर क्षेत्र

तालुक्यात ६८ हजार हेक्टर लागवडक्षेत्र आहे. सोयाबीन आणि कपाशीची बरोबरीने लागवड असते. यावेळी काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मान्सून वेळेवर येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना थेट मिळत असल्याने यंदा कपाशीची मोठी लागवड होण्याचे संकेत आहेत. सोयाबीनचीसुद्धा तेवढ्याच प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सोयाबीनवरील राेगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट आली. त्यामुळे यंदा सोयाबीन लागवडीसंदर्भात साशंकता आहे.

Web Title: Debt distribution started in Mahagaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.