तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; 52 नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:45 IST2020-12-23T17:45:06+5:302020-12-23T17:45:18+5:30

corona Virus News: सद्यस्थितीत जिल्ह्यात 340 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12386 झाली आहे.

Death of three corona patients; 52 newly positive in yavatmal | तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; 52 नव्याने पॉझिटिव्ह

तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; 52 नव्याने पॉझिटिव्ह

यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 52 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 40 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 


मृतकामध्ये यवतमाळ पुसद येथील 68 वर्षीय, वणी तालुक्यातील 80 वर्षीय आणि कळंब तालुक्यातील 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.23) एकूण 357 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 305 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 340 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12386 झाली आहे. 24 तासात 40 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11652 आहे. तर जिल्ह्यात एकूण 394 मृत्युची नोंद आहे. 


सुरवातीपासून आतापर्यंत 120517 नमुने पाठविले असून यापैकी 119919 प्राप्त तर 598 अप्राप्त आहेत. तसेच 107533 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: Death of three corona patients; 52 newly positive in yavatmal