शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

दारव्हाची टँकर मुक्तीकडे झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 5:00 AM

तालुक्याने टँँकर मुक्तीकडे झेप घेतली आहे. यावर्षी अद्याप कुठेही टँकरची आवश्यकता भासली नाही. गेल्यावर्षी श्रमदानातून झालेली जलसंधारणाची कामे, गावकरी आणि पंचायत समितीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.

ठळक मुद्देसामूहिक प्रयत्नांचे फलित : टंचाईग्रस्त गावांसाठी विविध उपाययोजना

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कधीकाळी उन्हाळ्यात तालुक्यातील ४८ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. आता त्याच तालुक्याने टँँकर मुक्तीकडे झेप घेतली आहे. यावर्षी अद्याप कुठेही टँकरची आवश्यकता भासली नाही. गेल्यावर्षी श्रमदानातून झालेली जलसंधारणाची कामे, गावकरी आणि पंचायत समितीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.तालुक्यातील २७ गावांत कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवू शकते. त्यासाठी पंचायत समितीने विविध उपाययोजना केल्या. तालुक्यात ८६ ग्रामपंचायतीअंर्गत ९४ गावे व १३० वस्त्या येतात. यातील एक लाख ६३ हजार ८९९ नागरिकांना प्रतिदिन प्रतिव्यक्ती ४० लीटर पाण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता ६६ नळ योजना, ४६० विहिरी, ४५३ विंधन विहिरींसह इतर माध्यमांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र तोरणाळा, तेलगव्हाण, धामणगाव, करजगाव, कोहळा, सांगवी, राजीवनगर, पिंपळगाव, पिंपळखुटा, कुऱ्हाड (बु.), नांदगव्हाण, वरुड, गोरेगाव, कुºहाड (खु.) निळोणा, राजुरा, जवळा, माहुली, घाटकिन्ही, हनुमाननगर, पाळोदी, भोपापूर, बोरगाव, शेलोडी, किन्हीवळगी, गौळपेंड, तपोना, कंझरा, सांगलवाडी, वागद (बु.) महातोली, खेड, पळशी, खोपडी (खु.), दयार्पूर, वडगाव (गा.), गाजीपूर, वागद (खु.) बोरी, मोरगव्हाण, विडूळ, निंभा, पिंप्री आदी गावांमध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती.या गावांत उपाययोजना करुनही पाणीसमस्या दूर होत नसल्याने २४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र गेल्यावर्षी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक संघटना आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून अनेक गावात रोपवाटिका, वृक्षारोपण, शेततळे, माती नाला बांध, दगडी बांध, सिमेंट प्लग बंधारे, सीसीटी, सलग समतल चर, धरणातील गाळ उपसणे, माती परीक्षण आदी जलसंधारणाची कामे झाली. परिणामी मोठा जलसाठा निर्माण झाला.पंचायत समितीतर्फे वार्षिक आराखड्याच्या माध्यमातून पाणीटंचाईचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे अनेक गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे.२० गावात जून अखेरीस टंचाईची शक्यतातेलगव्हाण, पिंपळखुटा, कुऱ्हाड (बु.), नांदगव्हाण, वरुड, गोरेगाव, मोरगव्हाण, विडूळ, बोरगाव, निंभा, पिंप्री, कुºहाड (खु.), भोपापूर, धामणगाव, करजगाव, राजुरा, कोहळा, निळोणा, सांगलवाडी, खोपडी (खु.), तोरणाळा, वागद (बु.), राजीवनगर, पिंपळगाव आदी गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची सध्या गरज नाही. तथापि यातील व इतर काही, अशा २० गावांमध्ये जून अखेरपर्यंत टंचाई निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेता तेथे खासगी विहीर अधिग्रहण, चार नळयोजना दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी